मुंबई

मुंबई पालिकेची मान्सूनपूर्व सज्जता!

CD

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १६ : पर्यावरणीय बदलांमुळे प्रत्येक ऋतूवर या बदलांचा परिणाम दिसून येत आहे. त्यामुळेच मुंबईतील विविध यंत्रणांनी पावसाळ्याच्या काळात पूरपरिस्थितीच्या आव्हानावर मात करण्यासाठी सज्ज रहावे. मुंबईसारख्या मेगासिटीमध्ये पुराचा धोका टाळण्यासाठी सर्व यंत्रणांनी यंदा पावसाळापूर्व कामांमध्ये चोख भूमिका बजावावी, असे आवाहन पालिका आयुक्त तथा प्रशासक इक्बाल सिंह चहल यांनी सर्व यंत्रणांना केले. आयुक्तांच्या अध्यक्षतेत आज पार पडलेल्या मान्सूनपूर्व-२०२३ आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या.

आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीला मध्य व पश्चिम रेल्वे, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद प्राधिकरण, भारतीय हवामान खाते, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, म्हाडा, मुंबई मेट्रो, राज्य शासनाचे सार्वजनिक बांधकाम खाते, बेस्ट, विविध विद्युत वितरण कंपन्यांच्या प्रतिनिधींसह विविध संस्थांचे प्रतिनिधी हजर होते. रेल्वे आणि महानगरपालिकेने गतवर्षीच्या पावसाळ्यात अतिशय उत्तम समन्वय साधून काम केल्यानेच उपनगरीय लोकल सेवा अव्याहतपणे सुरू होती. यंदाही त्याच धर्तीवर उत्तम समन्वयाने काम करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.

यंदा नागरिकांना हवामानाच्या माहितीचे एसएमएस मिळणार, आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून यंदाच्या पावसाळ्याच्या कालावधीसाठी नियंत्रण कक्ष तसेच हवामानाचे वेळोवेळी अलर्ट देणारी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. अतिवृष्टीच्या काळात पाणी साचणाऱ्या ठिकाणी पाणी उपसा करणारे पंप हे शहर आणि उपनगरात ४८० ठिकाणी लावण्यात येणार आहेत, अशी माहितीही या वेळी देण्यात आली.

तीन हजार रुग्णशय्या सज्ज
आगामी पावसाळी आजारांसाठीची तयारी म्हणून पालिकेकडून ३ हजार रुग्णशय्या राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्यासोबतच पाण्यामुळे होणाऱ्या आजारांसाठी नमुने घेण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. हिवताप (मलेरिया), डेंगी नियंत्रणासाठीची बैठक नुकतीच पार पडली असून जनजागृतीसाठीच्या उपाययोजना करण्यात आल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले.

धोकादायक इमारतींसाठी मोहीम राबवा
सी १ श्रेणीतील धोकादायक इमारती रिकाम्या करण्याच्या सूचना आयुक्तांनी यावेळी दिल्या. धोकादायक इमारतींमधील रहिवाशांना इमारत रिकामी करण्याच्या नोटीस बजावण्याच्या तसेच रहिवाशांसाठी पर्यायी व्यवस्था करण्याच्याही सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या. उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये धोकादायक इमारतींचा पाणीपुरवठा खंडित करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधितांना दिल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT