मुंबई

वाढत्या उष्णतेमुळे आरोग्याच्या तक्रारी

CD

वाशी, ता. १८ (बातमीदार) ः नवी मुंबईत शहराचे तापमान गेल्या काही दिवसांपासून ४० अंशांच्या घरात आहे. सततच्या तापमानवाढीचा आरोग्यावर परिणाम होत असल्याने खोकला, चक्कर, डोकेदुखी, कमी रक्तदाब, उष्माघात, तसेच पोटाचे विकार वाढल्याने रुग्णालयांबाहेर रुग्णांच्या रांगा लागत आहेत.
उन्हाचा तडाखा वाढू लागल्याने घशाला पडणारी कोरड टाळण्यासाठी सध्या रस्त्यावरचे ज्यूस, फळे, बर्फाचे गोळे, कुल्फी खाणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. सध्या शहरातील विविध भागांत मोठ्या प्रमाणात शीतपेय विक्रेते उभे असल्याचे चित्र आहे. शहरातील रेल्वेस्थानके, तसेच वर्दळीच्या ठिकाणांवर आरोग्याला घातक ठरणाऱ्या शीतपेयांची विक्री केली जात आहे. पण त्यासाठी कोणत्या प्रकारचे पाणी वापरले जात आहे, याची कल्पनाही नसल्याने विविध आजार बळावत आहेत. या विक्रेत्यांकडून वापरले जाणारे दूषित पाणी पोटाच्या तक्रारीसाठी निमित्त ठरत आहे.
-----------------------------------------
लहान मुलांना सर्वाधिक त्रास
सध्या तापमानात प्रचंड उष्मा वाढला आहे. तापमान वाढीने ज्येष्ठांसह लहान मुलांमध्ये डीहायड्रेशन किंवा उष्माघाताचे प्रमाण वाढत आहे. त्यांची त्वचा खूप नाजूक असल्याने उन्हाच्या तडाख्यात शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे या दिवसांत भरपूर पाणी पिण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे.
----------------------------------------------
रस्त्यावर लिंबू सरबत विक्री करणारे नामांकित कंपन्यांचे बाटलीबंद पाणी वापरत असल्याचा फलक लावतात, पण अनेकदा तेही हानिकारक असते. या सरबताचे ग्लास धुण्यासाठी कोणते पाणी वापरले जाते याची आपल्याला माहितीही नसते. दूषित पाण्यामुळे कावीळसारखे आजार होतात.
- डॉ. शाम यादव, आहारतज्ज्ञ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT