मुंबई

विटाव्यातील जलकुंभ उद्‌घाटनाच्या प्रतीक्षेत

CD

किरण घरत : सकाळ वृत्तसेवा
कळवा, ता. १७ : कळवा परिसरातील नागरिकांची पाण्याची गैरसोय दूर करण्यासाठी ठाणे महापालिकेने तीन वर्षांपूर्वी कळवा परिसर, आईनगर, मनीषा नगर, कळवा पूर्व भागातील वाघोबा नगर व विटावा या सहा ठिकाणी सुमारे २५ कोटी खर्च करून जलकुंभ बांधले. यातील विटावा सोडून इतर ठिकाणचे पाच जलकुंभांतून पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला. मात्र विटावा परिसरासाठी कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयासाठी बांधण्यात आलेला २५ दशलक्ष लिटर क्षमतेचा जलकुंभ काम पूर्ण होऊनही गेल्या तीन वर्षांपासून अजून उद्‌घाटनाच्या प्रतीक्षेत आहे.
विटावा परिसराची लोकसंख्या सध्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे विटावा, सूर्यनगर, संभाजी चौक आदी खाडी किनारी असणाऱ्या चाळीतील नागरिकांना कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. या वर्षी आधीच तापमानात वाढ झाली आहे, तसेच पाईपलाईन दुरुस्तीसाठी गेल्या दोन ते तीन महिन्यांत अनेक वेळा पाणीपुरवठा बंद करण्यात येत आहे. त्यामुळे येथील नागरिकांना पाण्याची झळ सोसावी लागत आहे. कळव्यातून विटावा परिसरात सुरळीत पाणीपुरवठा व्हावा यासाठी गेल्या तीन वर्षांपासून या जलकुंभाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. या जलकुंभापासून पाण्याची पाईपलाईन ही बसविण्यात आली आहे. लवकरच ही पाणी योजना सुरू होईल म्हणून येथील नागरिकांना प्रतीक्षा आहे. मात्र ही योजना उद्‌घाटनाअभावी रखडली आहे. त्यामुळे नागरिकांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे.

१५ वर्षे जुन्या टाकीची दुरवस्था
विटाव्यातील नागरिकांची पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी महापालिकेने विटावा येथे गेल्या १५ वर्षांपूर्वी ८० लाख रुपये खर्च करून पाण्याची टाकी बांधली. मात्र येथे या टाकीतून पाणीपुरवठा सुरू झालाच नाही. आता या बांधण्यात आलेल्या दुसऱ्या टाकीचे उद्‌घाटन होत नसल्याने येथील नागरिकांची पाण्याची प्रतीक्षा कायम आहे.
...
सध्या विटाव्यात पाण्याची टंचाई सुरू आहे. येथे पाण्याची टाकी बांधून तयार आहे. पाणीपुरवठा विभागाने नागरिकांचा अधिक अंत न पाहता या टाकीतून पाणीपुरवठा सुरू करावा, अन्यथा आम्हाला आंदोलन करावे लागेल.
- सुशांत सूर्यराव, उपशहराध्यक्ष, मनसे, विटावा
.....
जलकुंभाचे काम पूर्ण झाले असून सध्या या जलकुंभातून पाण्याचा दाब वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ते पूर्ण झाल्यावर या टाकीतून पाणीपुरवठा सुरू करण्यात येईल.
- अतुल कुलकर्णी, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग, ठाणे महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT