

E-20 Petrol
ESakal
मुंबई : ई-२० अर्थात २० टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोलचा वापर वेगाने वाढत असताना वाहनचालकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. सरकार आणि वाहन उत्पादक हे इंधन ऊर्जा सुरक्षा व पर्यावरणासाठी हे महत्त्वाचे असल्याचा दावा करतात, मात्र दुसरीकडे या इंधनामुळे वाहनांमध्ये बिघाड होत असल्याच्या तक्रारी वाढत असून, वाहनधारकांमध्ये नाराजीही दिसून येत आहे. वाहनांचा मायलेज कमी झाला, अशा तक्रारींमध्ये वाढ झाल्याचे वाहनचालक, गॅरेजवाल्यांचे म्हणणे आहे.