मुंबई

पोटनिवडणुकीत ७५ टक्के मतदान

CD

डहाणू, ता. १८ (बातमीदार) : तालुक्यातील आठ ग्रामपंचायतींमधील नऊ प्रभागांतील सदस्यांच्या पोटनिवडणुकीसाठी आज (ता. १८) मतदान झाले. नऊ जागांसाठी १९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे असून, दुपारी चार वाजेपर्यंत ७५ टक्के मतदान झाल्याचे सांगण्यात आले. उद्या (ता. १९) मतमोजणी होणार असून मतदार, उमेदवारांचे या निकालाकडे लक्ष लागले आहे.

तालुक्यातील आसनगाव, कैनाड, चरी कोटबी, जामशेत, मुरबाड, दह्याळे, निकणे, हळद पाडा या आठ ग्रामपंचायतींतील नऊ जागांसाठी गुरुवारी पोटनिवडणूक झाली. दुपारपर्यंत मतदान शांततेत पार पडले. तालुक्यात कोणत्याही गावामध्ये मतदानावेळी अनुचित प्रकार घडला नाही, असे निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अभिजित देशमुख यांनी सांगितले.

३२ ग्रामपंचायतींच्या ४६ प्रभागांत ६१ उमेदवारांच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुका घेण्यात येणार होत्या, मात्र २४ ग्रामपंचायतींमधील काही जागा बिनविरोध निवडून आल्या, तर काही ग्रामपंचायतींमध्ये उमेदवारी अर्जच भरले नाहीत. त्यामुळे आठ ग्रामपंचायतींमधील नऊ सदस्यांसाठी १९ उमेदवारांसाठी मतदान घेण्यात आले आहे. आजच्या मतदानासाठी निवडणूक निर्णय अधिकारी अभिजित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

चंडीगावमध्ये एका जागेवर मतदान
चंडीगावात अनुसूचित समाजाचा एकही मतदार राहत नाही, मात्र ग्रामपंचायतीवर चार जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव ठेवण्यात आल्याने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. सध्या ही याचिका प्रलंबित असल्याने चंडीगाव ग्रामपंचायतीच्या वारंवार निवडणुका लावूनही एकही उमेदवारी अर्ज भरला गेला नव्हता. त्यामुळे सन २००१ पासून ग्रामपंचायतीचा कारभार प्रशासक चालवत आहेत, मात्र आताच्या पोटनिवडणुकीत एका सर्वसाधारण जागेसाठी उमेदवारी अर्ज आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT