मुंबई

दीड लाख रुपयांचे बनावट तिकीट जप्त

CD

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १८ : उन्हाळ्याच्या सुटीत रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालांविरोधात पश्चिम रेल्वेच्या दक्षता पथकाने मुंबईतील साकीनाका परिसरात मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत एका तिकीट दलालाकडून दीड लाख रुपयांची बनावट रेल्वे तिकिटे जप्त करण्यात आली आहेत.

आरक्षित तिकिटांना उन्हाळी सुटीच्या काळात जास्त मागणी असते आणि दलाल प्रवाशांची फसवणूक करून या संधीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतात. पश्चिम रेल्वेच्या दक्षता विभागाला अशाच दलालीच्या घटनेची माहिती मिळाली होती. त्यानुसार दोषींना पकडण्यासाठी सापळा रचण्यात आला. या दक्षता पथकाने नुकताच साकीनाका परिसरात तपासणी केली असता अलीम नामक व्यक्तीला अटक करण्यात आली. त्याची चौकशी केली असता त्यांच्याकडून अंदाजे १.४ लाख रुपयांची आरक्षित रेल्वे तिकिटे जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तिकीट दलालाला आरपीएफ-अंधेरीच्या ताब्यात देण्यात आले आहे. या रॅकेटचा सूत्रधार अफजल हा फरारी असून या प्रकरणाचा अधिक तपासदक्षता आणि आरपीएफ जवानांचे विशेष पथक करत असल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली आहे.

अशी होते ‘बनावटगिरी’
रेल्वेच्या तपासात बनावट तिकिटे रेल्वे स्टेशनरीच्या प्रतिकृतीवर छापलेली डुप्लिकेट तिकिटे असल्याचे आढळून आले. मूळ तिकिटे एका दिवसात येथे पोहोचवणे शक्य नव्हते. त्यामुळे ‘तत्काळ’ तिकिटे देशातील दूरदूरच्या ठिकाणाहून आणली जायची आणि त्यातील मजकूर मुंबईतील एजंटना दाखवला जायचा, अशी यातील मोडस ऑपरेंडी होती. एजंट त्यांच्या कार्यालयातील प्रिंटरमधून ही तिकिटे छापत असत आणि प्रवाशांना चढ्या दराने विक्री करत होते. विशेष म्हणजे तिकिटावरील शिक्के खरे आहेत की बनावट, हे वेगळे करणे अशक्य होते, असे पोलिसांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT