मुंबई

कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये अशोक राणेंचा गौरव

CD

मुंबई, ता. २२ ः फ्रान्समध्ये सुरू असलेल्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये ज्येष्ठ चित्रपट-समीक्षक आणि अभ्यासक अशोक राणे यांना यंदाचा सत्यजित राय स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. फिप्रेस्की या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या अध्यक्षा इसाबेल डॅनल यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना देण्यात आला. कान फिल्म फेस्टिव्हलमधल्या इंडिया पॅव्हेलियन इथे हा कार्यक्रम पार पडला. सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
काही दिवसांपूर्वी राणे यांना हा पुरस्कार जाहीर झाला होता. फिप्रेस्की इंडिया या संस्थेतर्फे सिनेमासंदर्भातील उत्तमोत्तम लेखन करणाऱ्या लेखकाला हा पुरस्कार देण्यात येतो. यापूर्वी अरुणा वासुदेव (२०२१) प्रो. शनमुगदास (२०२२) यांना सत्यजित रे स्मृती पुरस्कार देण्यात आला आहे. अशोक राणे हे गेली ४६ वर्ष चित्रपटासंदर्भात लेखन करत आहेत. त्यांना या लेखनासाठी आजवर तीनदा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. असा पुरस्कार मिळवणारे ते मराठीतले एकमेव लेखक आहेत.
फिप्रेस्की या सिनेमा समीक्षकांच्या संघटनेची स्थापना १९३० ला ब्रुसेल्स, बेल्जियम इथे झाली. त्याच्या भारतीय शाखेची म्हणजे फिप्रेस्की इंडियाची सुरूवात १९९२ मध्ये झाली. तेव्हापासून सिनेमा समीक्षण, सिनेमा लिखाणासंदर्भात ही संघटना काम करत आहेत. देशभरातून ४० हून अधिक सदस्य या संघटनेचा भाग आहेत.
...
अशोक राणे यांची साहित्य संपदा
सिनेमाची चित्रकथा (१९९५), चित्र मनातले (१९९६), अनुभव (१९९७) चित्रपट एक प्रवास (२००१) सख्ये सोबती (२००३) व्ह्यूस ॲण्ड थॉट्स ऑन स्क्रीप्ट रायटिंग (२००६) मोन्ताज (२०१५) आणि सिनेमा पाहणारा माणूस (२०१९) अशी अशोक राणे यांची साहित्य संपदा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG सिलिंडर पुन्हा महागणार! केंद्र सरकारचे संकेत, वाढीमागचं कारणही स्पष्ट सांगितलं

Pune Water Cuts: खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा घटला; पुण्यात सोमवारपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा

Health Workers: राज्यात ४,१९३ आरोग्य कर्मचाऱ्यांच्या बदल्या, समुपदेशनाद्वारे प्रक्रिया

Baramati News : उपमुख्यमंत्र्यांची शासकीय वैदयकीय महाविद्यालयात सरप्राईज व्हिजिट आणि प्रशासनाची पळापळ....

Mumbai Strike: टँकर चालकांचा संप, बेस्टचाही आंदोलनाचा इशारा, उष्णतेचा तडाखा... मुंबईकरांवर ट्रिपल संकट; चिंता वाढली

SCROLL FOR NEXT