dry fish price increases due to monsoon food  sakal
मुंबई

Dry Fish : सुक्या मासळीचे दर गगनाला; खवय्यांच्या तोंडचे पाणी पळाले

पावसाळ्यात मासेमारी बंद होणार असल्‍याने मागणीत वाढ

सकाळ वृत्तसेवा

तळा : पावसाळा काही दिवसांवर आला असून दोन महिने खोल समुद्रातील मासेमारी बंद राहणार आहे. त्‍यामुळे हंगामाचा शेवट चांगला करण्यासाठी मच्छीमार सरसावले आहेत. मात्र पकडलेली मासळी बाजारात न विकता, सुकवून ठेवण्याकडे मच्छीमारांचा कल वाढत आहे. पावसाळ्यासाठी अनेक गृहिणींकडून साठा करून ठेवण्यात येत असल्‍याने सुक्या मासळीला मागणी वाढली आहे, त्‍याबरोबर दरही गगनाला भिडले आहेत.

कोळीवाड्यात मासळी सुकवण्याचे काम सध्या जोमाने सुरू आहे. सध्या कडक उन्हाळा सुरू असल्यामुळे रस्त्यांवर बोंबील, जवळा, मांदेली, कोळंबी, बांगडा, माकूल आणि आंबाड या मासे सुकवण्यासाठी ठेवले आहेत. वातावरणातील बदलांमुळे खोल समुद्रातील मासेमारीवरही परिणाम झाल्याने मच्छीमारांनी मासळी सुकवण्यास प्राधान्य दिले आहे. पावसाळ्यातील बेगमीसाठी सुक्या मासळीला मागणी वाढली आहे.

राज्यभरातून सुक्या मासळीला मागणी असते. रायगडमधील आक्षी, वरसोली, जीवनाबंदर, राजपुरी कोळीवाड्यातून दररोज काही टनांमध्ये सुकी मासळी राज्यातील इतर भागात पाठवली जाते. त्‍यामुळे स्थानिक बाजारात सुक्या मासळीचे दर वाढले आहेत. सुटीसाठी कोकणात आलेले चाकरमानी सुक्या मासळीची बेगमी जमा करीत आहेत, मात्र वाढलेल्या किमतीमुळे खिशाला कात्री लागत आहे.

इतर जिल्ह्यातून मागणी
रायगडमधील सुक्या मासळीसाठी सर्वांत मोठी बाजारपेठ मुंबई आहे. त्यानंतर पुणे, नाशिक, सातारा यांसह मराठवाड्यात सुकी मासळी पाठवली जाते. सध्या तिथल्‍या बाजारपेठांमध्ये सुक्या मासळीला भाव वाढल्याने जास्तीत जास्त साठा नेण्याचा प्रयत्न व्यापाऱ्यांचा आहे. स्थानिक बाजारपेठांमध्ये सुक्या मासळीचा तुटवडा जाणवू लागल्‍याने दर वाढले आहेत. यात बोंबील, वाकटी, आंबाड, सोडे, ढोमी, बांगडा, सुकट आदींचा यामध्ये समावेश आहे.

ढगाळ वातावरणाचा फटका
अवकाळीसह ढगाळ वातावरणामुळे मध्यंतरी मासळी सुकवण्यात अडचणी आल्‍या होत्‍या. खोल समुद्रात मासळी मिळाली तर सुकवण्यासाठी पोषण वातावरण नव्हते आणि जेव्हा वातावरणातील उष्‍मा वाढला तेव्हा मासळीच मिळेनाशी झाल्‍याने मच्छीमार हवालदिल झाले आहेत. सध्या पडणाऱ्या उन्हामुळे ताजी मासळी लगेचच सुकवली जात आहे. तिचा दर्जा व चव चांगली राहिल्‍यास भाव चांगला मिळतो. त्‍यामुळे मच्छीमार मासळी त्वरित विकण्याऐवजी सुकवून विकण्याला प्राधान्य देत आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा सुक्या मासळीचे दर हे वाढले असून मासे वाळवण्यासह खारवणे ही प्रक्रियाही परवडणारी नसल्याचे विक्रेत्‍यांकडून सांगण्यात येत आहे.

मासळी दर (रुपयांमध्ये)
बोंबील - ६०० ते ७००
करंदी - ६००
जवळा - ४०० -५००
मांदेली - ३५०-४००
दांडी - ५००-६००
माकल्या - ३५०-४००
सोडे - १८००-२०००
वाकट्या - ५००-७००

सुकी मासळी विकण्यासाठी सोशल मीडियासारख्या साधनांचा उपयोग होतो. मांसाहारामध्ये सुकी मासळी खूपच परवडणारी असल्‍याने तिला पसंती दिली जाते. यंदा वातावरण बदलामुळे मासळी दुष्‍काळ पडल्‍याने सुकी मासळीही बाजारात कमी असल्‍याने दर वाढले आहेत.
- सुवर्ण बंदरी, मच्छीमार महिला, श्रीवर्धन

नियमानुसार १ जूनपासून मासेमारी बंद होते. पावसाळ्यापूर्वी समुद्राला उधाण येत असल्याने नुकसान टाळण्यासाठी मच्छीमार
खोल समुद्रात जाणे टाळतात. सध्या समुद्रातील पाण्याचा प्रवाह वेगाने बदलत आहे. जाळी तुटणे, नौका नियंत्रणात न राहणे असे प्रकार घडत आहेत. त्यामुळे २५ मे पासूनच मच्छीमार बंदरात येण्यास सुरुवात करतील. मासेमारीचा हा शेवटचा फेरा आहे.
- मच्छिंद्र गिदी, मच्छीमार, राजपुरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT