मुंबई

डोंबिवलीत काही तासांत ६२ रिक्षांवर कारवाई

CD

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २३ : डोंबिवली शहरात कल्याण येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आणि डोंबिवली वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त तपासणी मोहीम राबवत ६२ बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई केली. या रिक्षाचालकांकडून एक लाख ९३ हजार रुपयांचा दंड एका दिवसात वसूल करण्यात आला असल्याचे वाहतूक पोलिस निरीक्षक उमेश गित्ते यांनी सांगितले.
डोंबिवलीतील रिक्षाचालकांविषयीच्या अनेक तक्रारी आरटीओकडे प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारीवरून सोमवारी दुपारी डोंबिवलीतील वर्दळीचे रस्ते पंडित दिनदयाळ रोड, पूर्वेतील टिळक चौक, इंदिरा चौक आदी परिसरात उपप्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी विनोद साळवी यांच्या आदेशावरून मोटार वाहन निरीक्षक अनिल धात्रक, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक नीलेश अहिरे, डोंबिवली वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक उमेश गित्ते यांची तपासणी पथके डोंबिवलीत दाखल झाली. त्यांनी प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांना थांबवून त्यांच्या जवळील रिक्षा कागदपत्रांची पडताळणी सुरू केली. यावेळी अनेक रिक्षाचालक सफेद, खाकी गणवेश न घालता साध्या वेशात रिक्षा चालवत असल्याचे आढळले. काही चालक रिक्षा वाहनतळ सोडून प्रवासी वाहतूक करत होते. काहींजवळ वाहन परवाना नव्हता. काही चालक चार प्रवासी घेऊन वाहतूक करत असल्याचे आढळले. अशा एकूण ६२ रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई करून एक लाख ९३ हजार रुपयांचा दंड तीन ते चार तासांच्या कारवाईत वसूल करण्यात आला. या कारवाईमुळे काही रिक्षाचालकांनी मार्ग बदलून प्रवास करण्याचा प्रयत्न केला. त्यांनाही अडवून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली, असे वाहतूक पोलिस निरीक्षक उमेश गित्ते यांनी सांगितले. बेशिस्त रिक्षाचालकांवर ही कारवाई यापुढेही सुरूच राहणार असल्याचे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

Fridge Tips : उन्हाळ्यात फॅनला जसा आराम देतो तसा फ्रीजलाही द्यावा का? 1-2 तास बंद ठेवला तर फायदा होतो की नुकसान?

Auto-Brewery Syndrome : एक घोटही न पिता हा माणूस असतो टल्ली.. याचं शरीरच तयार करतं अल्कोहोल! जडलाय विचित्र आजार

Latest Marathi News Live Update : अमेठी-रायबरेलीमधून राहुल-प्रियांका यांच्या उमेदवारीबाबत जयराम रमेश काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT