मुंबई

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी हिंदुजा रुग्णालयात दाखल

CD

मुंबई, ता. २३ : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी यांना सोमवारी (ता. २३) रात्री मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सेमी-कोमाच्या गंभीर स्थितीत त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याचे हिंदुजा रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे; परंतु त्यांना आपत्कालीन वैद्यकीय उपचारांची गरज लागण्याची शक्यता हिंदुजा रुग्णालयाकडून वर्तवण्यात आली.

जोशी यांना सोमवारी रात्रीपासूनच अस्वस्थ वाटत होते. त्यामुळे त्यांना रात्री उशिरा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना व्हेंटिलेटरची गरज नसून ते स्वतःहून श्वास घेत असल्याचे उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले. त्यांच्या मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण झाला आहे. ब्रेन ट्युमरशी संबंधित गुंतागुंतीमुळे त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असली तरी त्यांच्यावर वैद्यकीय उपचारातील गंभीर व्यवस्थापनाची गरज असल्याचे डॉक्टरांकडून स्पष्ट करण्यात आले.

गेल्या काही वर्षांपासून जोशी राजकारणापासून दूर आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतील जोशी सर म्हणजे पहिल्या फळीतील नेते आहेत. १९९५ मध्ये शिवसेना-भाजप युती सरकारचे ते मुख्यमंत्री होते. त्यांनी लोकसभेचे अध्यक्षपदही भूषवले आहे. मनोहर जोशी यांनी आतापर्यंत नगरसेवक, महापौर, विधान परिषद सदस्य, लोकसभा अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशी अनेक पदे भूषवली आहेत. गेल्या वर्षी जूनमध्ये एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यावर त्यांनी मनोहर जोशी यांची भेट घेतली होती.

उद्धव आणि रश्मी ठाकरे यांनी घेतली भेट
उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी आज हिंदुजा रुग्णालयात जाऊन मनोहर जोशी यांच्या प्रकृतिस्वास्थाची विचारपूस केली. जोशी यांच्यावर डॉ. चारुलता संकला यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू असून प्राथमिक पातळीवर जोशी यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. आज काँग्रेसचे नाना पटोले यांच्यासह मूळ शिवसेनेचे काही खासदार-आमदार त्यांच्या भेटीला गेले होते. शिवाय, रात्री उशिरा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही रुग्णालयाला भेट देतील, असे सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT