मुंबई

केडीएमसीचे विशेष स्वच्छता अभियान

CD

कल्याण, ता. २५ (बातमीदार) : कल्याण-डोंबिवली पालिकेच्या पावसाळापूर्वीच्या विशेष स्वच्छता अभियानाला नुकतीच सुरुवात झाली आहे. पालिका क्षेत्रातील मुख्य रस्ते व अंतर्गत रस्त्यांवर डेब्रिजसह कचऱ्याची सफाई करण्यासाठी हे अभियान हाती घेण्यात आले आहे. या अभियानाचा शुभारंभ बुधवारी पालिका अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांचे हस्ते करण्यात आला. यावेळी घनकचरा विभागाचे ए. एल. घुटे, वसंत देगलूरकर या अधिकारी समवेत सर्व स्वच्छता अधिकारी, स्वच्छता निरिक्षक व इतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते. सदर मोहिमेअंतर्गत बांधकाम विभागाचे पाच जेसीबी व पाच डंपर्स व घनकचरा व्यवस्थापन विभागातील कार्यरत पाच जेसीबी व दहा डंपर्स याचा वापर करून सर्व दहा प्रभागात मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेकरीता दोन उप मुख्य स्वच्छता अधिकारी, दहा सहा आयुक्त, दहा स्वच्छता अधिकारी, ३४ स्वच्छता निरिक्षक आणि सफाई कामगर कार्यरत राहणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karan Bhushan Singh: ब्रिजभूषण सिंहच्या मुलाच्या प्रचार रॅलीत फायरिंग? चौकशीतून काय समोर आलं?

Vada Pav Girl: ना अटक झाली, ना केस.. मग वडापाव गर्लला का घेऊन गेले दिल्ली पोलीस? व्हायरल व्हिडीओमागचं सत्य

Latest Marathi News Live Update : केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी वलसाडमध्ये जाहीर सभेला संबोधित केले

Tesla vs Tesla: ट्रेडमार्कवरून पेटला वाद! टेस्ला भारतीय कंपनीविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात; काय आहे प्रकरण?

Temperature : सोलापुरात ४३.२ अंश सेल्सिअसची नोंद; पुढील दोन दिवस पुन्हा ४४ पारा

SCROLL FOR NEXT