मुंबई

मुंबईत रंगणार आज ‘महेफिल-ए-गझल’

CD

मुंबईत आज रंगणार ‘महेफिल-ए-गझल’
गझलनवाज भीमराव पांचाळे आणि डॉ. कुणाल इंगळे यांच्या गायनाची मैफल

मुंबई, ता. २७ : अत्यंत भावोत्कट शब्दरचना अन् तितकेच बहारदार सादरीकरण करणारे गझलनवाज भीमराव पांचाळे आणि संगीतज्ञ डॉ. कुणाल इंगळे यांची ‘महेफिल-ए-गझल’ मैफल उद्या (ता. २८) सायंकाळी सहा वाजता श्री षण्मुखानंद चंद्रशेखरेंद्र सरस्वती सभागृहात रंगणार आहे. सामाजिक बांधिलकी जपतानाच समाजोपयोगी शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवण्यासाठी निधी उभारण्याच्या उद्देशाने महापालिका अभियंता, अधिकारी आणि कर्मचारी यांचा उपक्रम असलेल्या ऋणानुबंध अभियानाच्या वतीने मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे.
ऋणानुबंध अभियानांतर्गत विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करणे, गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करणे, वाचनालय तसेच ग्रंथालय चालवणे, विविध महापुरुषांची जयंती साजरी करणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, समाज मंदिर, समाज केंद्र, विपश्यना केंद्राची उभारणी करणे, समाजाच्या सांस्कृतिक विकासासाठी कलापथके, नाट्यसंस्था इत्यादी मार्गाने लोककलांचा विकास साधणे आदी उपक्रम राबवले जातात. हीच सामाजिक बांधिलकी जपताना विविध उपक्रम राबवण्यासाठी निधी उभारण्याच्या उद्देशाने ‘महेफिल-ए-गझल’चे आयोजन करण्यात आले आहे.
मैफलीच्या प्रवेशिका आरक्षित करण्यासाठी सचिन मगरे (९९३०९५४६०१), तुषार निकाळजे (९७०२०५३३४४), प्रशांत जगताप (९८६९३८६७१२) आणि प्रवीण कटारे (९९३०५०२३२२) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI व्यवहारांवर द्यावे लागणार शुल्क; नीती आयोगाच्या उपाध्यक्षांचे संकेत, कारणही सांगितलं...

Karmad News : उघड्या लिफ्टमधून बियाण्याची पोती नेताना तरुणाचा मृत्यू; कंपनी मॅनेजर, एचआर अधिकारी व कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा

Delhi Police IPS Transfers : दिल्ली पोलिस दलात मोठा फेरबदल; 5 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे नियुक्ती? पाहा बदल्यांची यादी

Bogus Doctor Crime : वारजे, खराडीत बोगस डॉक्टरांवर कारवाई; मनपाच्या बोगस वैद्यकीय व्यावसायिक शोध समितीची कारवाई

Latest Marathi News Live Update : मनमाड रेल्वे स्थानकात माथेफिरूचा धुमाकूळ; प्रवाशांवर दगडफेक, सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT