मुंबई

कामांवरून अधिकाऱ्यांना कानपिचक्या

CD

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २८ ः नवी मुंबई शहरात सध्या महापालिकेतर्फे मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू आहेत; मात्र ही कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश आयुक्त राजेश नार्वेकर यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. शहरात सुरू असलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी नार्वेकर यांनी नुकताच एक दौरा केला होता. या वेळी शहरातील नालेसफाईसोबत जलकुंभ, शाळा इमारतीच्या कामांची त्यांनी पाहणी केली होती.
बेलापूर ते घणसोली विभागाचा पाहणी दौरा केल्यानंतर महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी ऐरोली व दिघा भागातील विविध विकासकामांचा पाहणी केली आहे. या वेळी दिघ्यातील ग्रीन वर्ल्डपासून सुरू असलेल्या नालेसफाईची पाहणी सुरू करताना आयुक्तांनी निर्धारित वेळेत कामे पूर्ण करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच दिघा, ऐरोलीतील निवासी भागातील बंदिस्त गटारांच्या सफाईवर विशेष लक्ष देण्याचे सांगितले. तसेच दिघ्याच्या पश्चिमेकडील सेंच्युरी, बिंदूमाधवनगर, आंबेडकरनगर येथील नाल्यांची पाहणी करून नवीन रेल्वे स्टेशनसाठी ट्रॅक विस्तारीकरणाचे काम करण्यासाठी टाकलेल्या भरावामुळे पाणी तुंबण्याचा धोका लक्षात घेता रेल्वेने कल्व्हर्टचे काम लवकरात लवकर पूर्ण करून घेण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करावा, असे निर्देश अभियांत्रिकी विभागास दिले आहेत.
-----------------------------------
रस्ते, गटारे, पदपथ अशा प्रकारच्या कामांना गती द्या. कामांची गरज लक्षात घेऊनच कामे करावीत. तसेच अनावश्यक कामे टाळावीत; तसेच खर्चावर नियंत्रण ठेवावे, अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
- राजेश नार्वेकर, आयुक्त, नवी मुंबई महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT