मुंबई

दृष्‍टीकोन

CD

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन
घाटकोपर (बातमीदार) ः भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील तेजस्वी योद्धे विनायक दामोदर सावरकर यांची जयंती साजरी करण्यात आली. घाटकोपर पूर्वेतील स्वामी समर्थ मठ मार्ग येथे स्वदेशी सावरकर यांच्या स्मारकाला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. या वेळी शिवसेना ठाकरे गटाचे विभागप्रमुख सुरेश पाटील, चंद्रपाल चंदेलिया, माजी उपविभागप्रमुख प्रकाश वाणी, विधानसभा सह संघटक नरेश माटे, उपविभाग समन्वयक विलास लिगाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

बोरिवलीत लहानग्‍यांना बँक पासबुकवाटप
कांदिवली (बातमीदार) ः आमदार सुनील राणे यांनी शंभर गरीब मुलींचे बँकेत खाते सुरू केले आहे. मोदी सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्‍याच्या निमित्ताने बोरिवली पश्चिम येथील मनोरम सभागृहात बँक पासबुक वाटपाचा कार्यक्रम पार पडला. आमदार सुनील राणे, जिल्हा अध्यक्ष गणेश खणकर, अथर्व फाऊंडेशनच्या उपाध्यक्षा वर्षा राणे, माजी नगरसेवक प्रवीण शाह यांच्या हस्ते तब्बल शंभर मुलींना बँक पासबुकसह बचत पिगी बँक देऊन सन्मानित करण्यात आले. स्टेट बँक ऑफ इंडियाचे मुख्य अधिकारी संतोष राणे, बँक व्यवस्थापक ज्योत्स्ना महाजन यांनी सर्वतोपरी सहकार्य केले. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात केली.

मुलुंडमध्ये अथर्वशीर्ष पठण
मुलुंड (बातमीदार) ः महाराष्ट्र सेवा संघाच्या संस्कृत विभागातर्फे गणपती अथर्वशीर्ष पठणाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये अथर्वशीर्ष पठणासोबतच त्यातील शब्दांचा अर्थ आणि शुद्ध शब्दोच्चारण करण्याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. याप्रसंगी सेवा संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर वझे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम रविवारी (ता. ४) संध्याकाळी साडेचार ते साडेसात दरम्यान सेवा संघाच्या गोखले सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाला येण्यापूर्वी सर्व नागरिकांनी अथर्वशीर्ष पठणाची एक प्रत सोबत आणावी. कार्यक्रमाला प्रवेश मोफत असून सर्व नागरिकांनी त्याला उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

महिलांना स्वसंरक्षणाचे धडे
वडाळा (बातमीदार) ः रफी अहमद किडवाई मार्ग पोलिस ठाण्याच्या निर्भया पथकाने शनिवारी (ता. २७) शिवडी पश्चिम येथील रामटेकडी उद्यान येथे महिला जागरुकता व स्वसंरक्षण प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात मार्शल आर्ट ट्रेनर महेश नवले आणि त्यांच्या टीमने सोनसाखळी स्नॅचिंग, दरोडा वगैरे करणाऱ्या गुन्हेगारांपासून स्वसंरक्षणाची विविध तंत्रे दाखवली. विशेष म्हणजे स्त्रिया आणि मुली प्रेक्षक स्वत: स्वसंरक्षणाच्या प्रत्येक धड्यात सहभागी झाल्‍या आणि प्रशिक्षण घेतले. सहायक पोलिस निरीक्षक कमलेश कुसाळकर यांनी लहान मुलांकडून मोबाईलचा होणारा गैरवापर, सामाजिक गुन्हे, बाल अत्याचार, युवकांचे भविष्य उद्ध्वस्त करणारे व्यसन याकडे श्रोत्यांचे लक्ष वेधले. हा कार्यक्रम वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुमुद कदम यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आला होता. पोलिस उपनिरीक्षक आनंद सावर्डेकर व पल्लवी जाधव, निर्भया पथकाच्या सदस्या योगीता महिरे, मनीषा कदम, परवीन खान, अश्विनी पगारे आदी मान्यवर उपस्थित होते.

सावरकरांना काव्यसुमनरूपी आदरांजली
कांदिवली (बातमीदार) ः ब्राह्मण सभा आपले शतक महोत्सवी वर्ष साजरे करत आहे. त्यानिमित्ताने स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘गीत वीर विनायक’ हा सतीश भिडे यांचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाची सुरुवात ‘जयोस्तुते’ या गीताने झाली. या कार्यक्रमातून श्रोत्यांना सावरकरांच्या जीवनातील अनेक पैलूंची माहिती मिळाली. सतीश भिडे यांना चित्रा जोशी, छाया खाडिलकर, मधुरा नाईक, सरोज डोंगरे, सीमा गांगल आदींची साथ मिळाली. कार्यक्रमानंतर उपस्थितांनी स्वतःहून देणगी जमा केली. हा निधी नितीन म्हात्रे यांच्या सैनिकी शिक्षण मार्गदर्शन शिबिरास देण्यात येईल, असे सतीश भिडे यांनी जाहीर केले.

‘करिअरचा मार्ग निवडताना’ कार्यक्रमाचे आयोजन
शिवडी (बातमीदार) ः विद्यार्थी उत्कर्ष मंडळाच्या करिअर मार्गदर्शन केंद्रामार्फत दहावी, बारावीनंतर काय करावे? या प्रश्‍नाचे उत्तर देण्यासाठी विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करणारा ‘करिअरचा मार्ग निवडताना’ या कार्यक्रमाचे शनिवारी (ता. ३) सायंकाळी सहा वाजता लालबाग येथील न्यू हनुमान थिएटर, चिवडा गल्ली येथे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला करिअर मार्गदर्शक, लेखक आणि व्याख्याते विवेक वेलणकर मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमास सर्वांना विनामूल्य प्रवेश दिला जाणार आहे. अधिक माहितीसाठी सागर बोने ८०८२४४१४८८ किंवा शैलेंद्र राणे ९९२०५७०९४० यांना संपर्क करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

सावरकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम
मुलुंड (बातमीदार) ः स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अभ्यास मंडळ, अखिल भारतीय चित्पावन ब्राह्मण महासंघ आणि महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंती दिनानिमित्ताने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राजकीय व्यक्तिमत्त्वाचा अराजकीय जीवनप्रवास या कार्यक्रमाद्वारे उलगडला जाणार आहे. तसेच सावरकर यांच्या स्मृतीला अभिवादन करून मधुबिंब निर्मित ‘कृतज्ञ मी कृतार्थ मी’ हा कार्यक्रम नेत्रा ठाकूर यांच्यातर्फे सादर करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे लेखक अनंत शंकर ओगले असून त्याचे दिग्दर्शक यतीन ठाकूर आहेत. यतीन ठाकूर आणि आणि सायली सांभारे या कलाकारांचा यामध्ये समावेश आहे. हा कार्यक्रम शनिवारी (ता. ३) संध्याकाळी सहा वाजता सेवा संघाच्या सु. ल. गद्रे सभागृहामध्ये होणार आहे. कार्यक्रमाला प्रवेश मोफत असून सर्व रसिक प्रेक्षकांनी त्याला उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT