मुंबई

रिक्षाच्या धडकेत विद्यार्थीनी जखमी

CD

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ३० : रस्ता ओलांडणाऱ्या एका १९ वर्षीय विद्यार्थिनीला रिक्षाची धडक बसून ती जखमी झाली. या अपघातात तिचे दोन दातदेखील पडल्याची घटना कल्याण पूर्वेत घडली आहे. याप्रकरणी विद्यार्थिनीने दिलेल्या तक्रारीवरून कोळसेवाडी पोलिसांनी रिक्षाचालकाविरोधात गुन्हा दाखल करत त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. कल्याण पूर्वेतील हाजी मलंगगड रोडवर चेतना शाळेसमोर सोमवारी सकाळी हा अपघात झाला. घरदुरुस्तीसाठी लागणारे साहित्य खरेदी करून हर्षदा वाघमारे ही १९ वर्षीय विद्यार्थिनी घरी जात होती. दरम्यान, नांदिवली दिशेकडून चक्कीनाका दिशेने जाणाऱ्या रिक्षाने तिला जोरदार धडक दिली. या धडकेत विद्यार्थिनीच्या हाता-पायाला गंभीर दुखापत झाली आहे. तसेच तिचे दोन दातदेखील पडले आहेत. या तरुणीला मदत करण्याऐवजी रिक्षाचालक घटनास्थळावरून पळून गेला. तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सुप्रिया सुळेंकडून दत्तात्रय भरणेंविरोधात तक्रार दाखल

UAPA: ओसामा बिन लादेनचे फोटो, ISIS चे झेंडे बाळगणे गुन्हा नाही: हायकोर्ट

MS Dhoni : अखेर सत्य आले समोर! रणनीती नाही तर... या कारणामुळे ९व्या क्रमांकावर बॅटिंगसाठी आला 'थाला'

Viral: पवार गटाचं काम करणाऱ्याला दत्ता भरणे यांच्याकडून शिवीगाळ? व्हिडिओ रोहित पवारांकडून शेअर

Met Gala 2024 : परी म्हणू की सुंदरा! रेड कार्पेटवर ईशाचाच जलवा, स्पेशल फ्लोरल ड्रेस बनवण्यासाठी लागले तब्बल 10 हजार तास

SCROLL FOR NEXT