मुंबई

जिल्ह्यातील ८५३ शाळांसह १६८ आरोग्य संस्था तंबाखू मुक्त

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३० : महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने सलाम फाऊंडेशन मुंबई यांच्या सहकार्यातून तंबाखूमुक्त शाळा हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमातून ठाणे जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील ८५३ शाळा; तर १६८ आरोग्य संस्था तंबाखूमुक्त झाल्या असल्याची माहिती जागतिक तंबाखूविरोधी दिनाच्या पार्श्वभूमीवर समोर आली आहे.
भारतासारख्या विकसनशील देशात अनेकांना तंबाखूसारख्या स्वस्त व्यसनाने ग्रासले आहे. यामुळे होणाऱ्या मृत्यूंना मोठ्या प्रमाणावर जनजागृती आणि मनावरील संयम एवढेच उत्तर आहे. अशातच ज्या ठिकाणी देशाची भावी पिढी शिक्षण घेत आहे, ती संस्कारक्षम व्हावी यासाठी शिक्षक प्रयत्न करीत असतात. त्याचाच एक भाग म्हणून शाळा व शाळा परिसर हा तंबाखूमुक्त म्हणून ओळखला जावा या उपक्रमांतर्गत प्रत्येक शाळेच्या आवारात जनजागृतीचे बॅनर लावण्यात येत आहेत. तसेच ज्या शाळा तंबाखूमुक्तीचे ११ निकष पूर्ण करतील, अशा शाळा तंबाखूमुक्त म्हणून घोषित करण्यात येतात. त्यानुसार ठाणे जिल्ह्यातील शहरी भागातील शाळांसह ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांची सलाम मुंबई फाऊंडेशनच्या ॲपवर नोंद करण्यात येत असते. यात तंबाखूमुक्त शाळांमध्ये ठाणे जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील ८५३ शाळांचा समावेश आहे; तर जिल्ह्यातील १६८ शासकीय संस्थादेखील तंबाखूमुक्त झाल्या असल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली.
…......................................
पाच हजार ७४७ नागरिकांचे समुपदेशन
सलाम मुंबई फाऊंडेशन आणि जिल्हा तंबाखू नियंत्रण विभागाच्या माध्यमातून तंबाखू सेवनापासून प्रवृत्त करण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात येत आहे; तर १९ तंबाखूमुक्ती केंद्राच्या माध्यमातून तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणाऱ्याचे समुपदेशन केले जाते. त्यानुसार मागील वर्षभरात या समुपदेशन केंद्रात येणाऱ्या पाच हजार ७४७ नागरिकांचे समुपदेशन करण्यात आले. या समुपदेशनाची फलश्रुती म्हणजे १४९ जण तंबाखूमुक्त झाले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली.
…......................................
२४० जणांवर दंडात्मक कारवाई
ठाणे जिल्ह्यातील शासकीय संस्था, आरोग्य विभाग आणि रस्त्यावर तंबाखूचे सेवन करून थुंकणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. त्यानुसार एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ या कालावधीत २४० जणांवर दंडात्मक कारवाई करीत ४७ हजार ७१० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
....................................
विद्यार्थ्यांमध्ये अथवा महाविद्यालयीन युवकांमध्ये तंबाखू आणि तंबाखूमुळे होणाऱ्या दुष्परिणामांची तसेच मैखिक कर्करोगाबद्दल जनजागृती करण्यावर भर दिला जात आहे. सध्य स्थितीत ८५३ शाळा व १६८ शासकीय संस्था तंबाखूमुक्त झाल्या आहेत.
- डॉ. अर्चना पवार, जिल्हा दंतचिकित्सक, ठाणे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Revanth Reddy: शहांचा 'तो' व्हिडिओ शेअर करणं भोवलं! तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी दिल्लीला बोलावलं

Rohit Pawar : विधानसभेआधी माझा अरविंद केजरीवाल करतील; आमदार रोहित पवार यांचा खळबळजनक दावा

CSK च्या मिचेलने एक-दोन नाही, तर पकडले तब्बल 5 कॅच अन् IPL मध्ये रचला मोठा विक्रम

Narendra Modi : ''कर्नाटकमध्ये संविधान बदलण्याचा प्रयत्न, परंतु जोपर्यंत मोदी जिवंत आहे तोपर्यंत..'' पंतप्रधान नेमकं काय म्हणाले?

Salman Khan Firing Case : सलमान खान गोळीबार प्रकरणातील चारही आरोपींना मोक्का कोर्टासमोर केलं हजर

SCROLL FOR NEXT