मुंबई

ठेकेदाराला पाच लाखांचा दंड

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३० : रस्तेदुरुस्ती आणि साफसफाईत त्रुटी ठेवणाऱ्या ठेकेदारांवर ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. आयुक्तांनी उद्यान, रस्ते साफसफाई करणाऱ्या ठेकेदारांना नोटिसा बजावून कामात सुधारणा करण्याची सक्त सूचना दिली आहे; तर रस्तेदुरुस्तीच्या वेळी सुरक्षा उपायांकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी मे. आरपीएस इन्फ्रास्ट्रक्चर या ठेकेदाराला पाच लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या आठवड्यात ठाणे शहरातील रस्ते आणि नालेसफाईच्या कामांची पाहणी करण्यासाठी दौरा केला. या पाहणी दौऱ्यात वसंत विहार येथील कॉनवूड चौक येथील मलनिस्सारण कामाची पाहणी करून कामास विलंब झाल्याबद्दल कार्यकारी अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. टिकूजिनीवाडी सर्कल ते नीळकंट रोड रस्ता दुभाजक व हरित जनपथ या ठिकाणी निगा व देखभाल योग्यरीत्या नसल्याचे आढळून आले. या ठिकाणी झाडे सुकलेल्या अवस्थेत आहेत. हरित जनपथामध्ये मोकळी जागा निदर्शनास आल्याने मे. निसर्ग लॅण्डस्केप प्रा. लि. या कंपनीच्या ठेकेदाराला आयुक्त बांगर यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
वर्तकनगर प्रभाग समितीअंतर्गत गावंडबाग ते हिरानंदानी मिडोज येथील रस्ता दुभाजक व हरित जनपथात अनेक ठिकाणी झाडे लावून सुशोभीकरण करणे अपेक्षित असताना मोकळ्या जागा निदर्शनास आल्या. तसेच रस्ता दुभाजक व हरित जनपथात अनेक ठिकाणी गवत/तण नियमित काढले न गेल्याने त्याची वाढ मोठ्या प्रमाणावर झाली असल्याचे दिसून आले. झाडांना नियमित पाणी दिले जात नसल्याने झाडे सुकलेल्या अवस्थेत आढळून आल्याने मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार मे. पायोनिअर आऊटडोअर मीडिया सोल्युशन प्रा. लि. या कंपनीच्या ठेकेदाराला आयुक्त बांगर यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

-----------------
सुरक्षेकडे दुर्लक्ष महागात पडले
ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील वर्तकनगर, लोकमान्य-सावरकरनगर, नौपाडा, कोपरी, कळवा प्रभाग समितीमधील विविध रस्त्यांचे डांबरीकरणाने पुनर्पृष्ठीकरणाचे काम मे. आरपीएस इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. या कंत्राटदाराला देण्यात आले आहे. या कामादरम्यान कोणत्याही प्रकारच्या सुरक्षिततेच्या उपाययोजना आढळून आलेल्या नाहीत. मास्टीक, अस्फाल्ट पद्धतीने करावयाच्या डांबरीकरणाच्या कामामध्ये काम करणाऱ्या मजुरांना सुरक्षिततेच्या दृष्टीने सेफ्टी शूज, हॅण्डग्लोव्हज, हेल्मेट उपलब्ध करून देण्यात आलेले नसल्याचे दिसून आले. त्यामुळे या कंत्राटदार कंपनीला पाच लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

---------------
काळ्या यादीत टाकण्याचा इशारा
वर्तकनगर प्रभाग समितीअंतर्गत येत असलेल्या पवार नगर येथील रस्ते साफसफाईचा ठेका व्यंकटेशा या कंपनीस देण्यात आलेला आहे. नेमून दिलेल्या कार्यक्षेत्रातील दैनंदिन रस्त्याची योग्य प्रकारे साफसफाई न करणे, तसेच रस्त्यावर काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांना गणेवश तसेच इतर सुरक्षा साधने दिली नसल्याचे आढळून आले. रस्त्यावर ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग निदर्शनास आल्याने संबंधित ठेकेदारास नोटीस बजावून दहा हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. कामकाजात अपेक्षित सकारात्मक सुधारणा न झाल्यास आपले कंत्राट मुदतपूर्व संपुष्टात आणून आपणास काळ्या यादीत का टाकण्यात येऊ नये? याबाबतचा खुलासा सादर करण्याचे निर्देश आयुक्त बांगर यांनी नोटिशीद्वारे दिले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''त्यांची लायकी नाही.. त्यांना कशाकशातून बाहेर काढलं, याची यादी वाचली तर फिरणं मुश्कील होईल'' पवारांचा धनंजय मुंडेंवर हल्ला

जुगार कंपन्यांकडून भाजपला इलेक्ट्रॉल बॉण्डव्दारे 1400 कोटी; पृथ्वीराज चव्हाण यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल

Jos Buttler IPL 2024 :वर्ल्डकपसाठी इंग्लंड संघाची घोषणा झाली अन् राजस्थानसह अनेक IPL संघांना बसला मोठा झटका

India Squad for T20 WC: केएल राहुलची टी20 कारकीर्द संपुष्टात? 'या' पाच खेळाडूंचीही संधी हुकली

Arvind Kejriwal: केजरीवालांना निवडणुकीपूर्वीच अटक का केली? सुप्रीम कोर्टानं ईडीकडून मागवलं उत्तर

SCROLL FOR NEXT