मुंबई

सेन्सेक्सची सलग चौथी वाढ

CD

मुंबई, ता. ३० ः परदेशी वित्तसंस्थांच्या खरेदीच्या जोरावर आज भारतीय शेअर बाजार निर्देशांक सलग चौथ्या दिवशी वाढले. आज सेन्सेक्स १२२.७५ अंश तर निफ्टी ३५.२० अंशांनी वाढला.

भारतीय शेअरचे भाव आज दिवसभर वर-खाली होत होते; मात्र शेवटच्या तासात खरेदी झाल्यामुळे सेन्सेक्स निर्देशांक पुन्हा नफ्यात आले. दिवसअखेरीस सेन्सेक्स ६२,९६९.१३ अंशांवर; तर निफ्टी १८,६३३.८५ अंशांवर स्थिरावला. आज बँका, वित्तसंस्था, एफ.एम.सी.जी., आयटी यांचे शेअर वाढले; तर वाहन निर्मिती कंपन्या, औषध निर्मिती कंपन्या, धातू निर्मिती क्षेत्र आणि ऊर्जा निर्मिती कंपन्या यांचे शेअर घसरले.

आज निफ्टीमध्ये कोटक बँक, बजाज फिन्सर्व्ह, बजाज फायनान्स, आयटीसी, एचडीएफसी लाईफ या शेअरचे भाव वाढले; तर निफ्टीमध्ये हिंदाल्को, अदाणी एंटरप्राइजेस, टेक महिंद्र, टाटा स्टील, डॉ. रेड्डी लॅब यांचे भाव घसरले. बीएससी ॲक्सिस बँक, इंडसइंड बँक, अल्ट्राटेक, विप्रो यांचे भाव एक टक्का वाढले. टेक महिंद्र, टाटा स्टील, सन फार्मा यांचे भाव एक टक्क्याच्या आसपास घसरले.
................
मिडकॅप इंडेक्स आणि बँक निफ्टी सर्वकालिक उच्चांकावर असल्यामुळे आता निफ्टीदेखील नवा सर्वकालिक उच्चांक गाठण्याच्या पातळीवर आहे.
- सिद्धार्थ खेमका, मोतिलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेस.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के, महाराष्ट्रात 54.09 टक्के मतदान

IPL 2024 DC vs RR Live Score: अभिषेक पोरेलचे आक्रमक अर्धशतक, दिल्लीच्या 120 धावा पार

राज्यसेवेला वर्णनात्मक पॅटर्न २०२५ पासूनच; बदल करण्याचा MPSCचा कुठलाही मानस नाही

Russia : पुतिन यांनी पाचव्यांदा घेतली रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ; आता पेलावी लागणार 'ही' आव्हाने

Latest Marathi News Live Update : PDCC बँकेवर आचारसंहिता भंगप्रकरणी गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT