मुंबई

वर्दळीच्या रस्त्यांवर फेरीवाल्यांचा कब्जा

CD

खारघर, ता. ३१ (बातमीदार) : ओवेपेठ गावाकडून शीघ्र कृती दलाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या उजव्या बाजूला मोकळ्या जागेवर फेरीवाल्यांनी कब्जा केला आहे. याठिकाणी गॅरेज, सर्व्हिस सेंटर, तसेच भंगार माफियांनी बेकायदा दुकाने थाटली असून पालिका कर्मचारी दुर्लक्ष करत आहेत.
खारघर सेक्टर तीस ते चाळीस परिसरात वाहनांच्या संख्येत वाढ होत आहे. तळोजा, ओवेपेठ, वास्तुविहार आणि खारघर टोल नाका, सेक्टर दहामार्गे कोस्टलवरवरून नवी मुंबई, मुंबई परिसरात जाता यावे, या उद्देशाने सिडकोने येथे चौपदरी रस्ता बांधला आहे. गेल्या काही वर्षांत सेक्टर ३४ पासून ४० पर्यंत खासगी, तसेच सिडकोच्या गृहनिर्माण प्रकल्पांमुळे मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले आहे. असे असताना पालिका अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने बेकायदा सर्व्हिस सेंटर, भंगार व्यवसाय, भाजी विक्री केली जात आहे. त्यामुळे मुख्य रस्त्यावरील या बेकायदा व्यवसायांकडे सिडको, तसेच महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष होत असल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
----------------------------------
ओवेपेठ गावाकडून शीघ्र कृती दलाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बेकायदा व्यवसाय करणाऱ्यांची माहिती प्राप्त झाली आहे. लवकरच त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
- जितेंद्र मढवी, प्रभाग अधिकारी, खारघर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kanhaiya Kumar: कन्हैया कुमारकडे एवढी आहे संपत्ती; दिल्लीच्या उमेदवारांमध्ये मनोज तिवारी सर्वात श्रीमंत

PM Modi's Advice To Muslims: जगभरातला मुसलमान बदलतोय पण... मुस्लिम धर्मियांना पहिल्यांदाच PM मोदींनी का दिला सल्ला?

Shekhar Suman : शेखर यांच्या मुलाला होता 'हा' गंभीर आजार; लेकाच्या निधनानंतर उचललं गंभीर पाऊल

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : दुपारी एक वाजेपर्यंत देशात 39.92 टक्के मतदान; महाराष्ट्रात 31.55 टक्के मतदानाची नोंद

बापरे! बॉल समजून पकडला बॉम्ब ... 13 वर्षीय मुलाचा स्फोटात मृत्यू , नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT