मुंबई

पावसाळ्यातील उपाययोजनांसह एमएमआरडीए सज्ज

CD

मुंबई, ता. ३१ ः सांडपाणी वाहून नेण्याची सोय नसलेल्या आणि पाणी जास्त प्रमाणात साचण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी अतिरिक्त क्षमता असलेले पाण्याचे पंप उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) महानगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी दिले आहेत. पावसाळ्यासाठी एमएमआरडीएतर्फे आपत्कालीन नियंत्रण कक्षाचीही स्थापना करण्यात आली आहे.

एमएमआरडीएने स्थापना केलेल्या नियंत्रण कक्षात २४ तास तक्रारींवर पाठपुरावा करून मुंबई महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि रेल्वेसारख्या विविध संस्थांच्या आपत्ती नियंत्रण कक्षांसोबत संवाद साधला जाणार आहे. माहितीची देवाणघेवाणही करण्यात येणार आहे. नियंत्रण कक्ष १ जूनपासून ३० सप्टेंबरपर्यंत कार्यरत राहणार आहे. प्राधिकरणामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध प्रकल्पांच्या ठिकाणी वाहनांची व पादचाऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून एमएमआरडीएने नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे.

कर्मचाऱ्यांना तीन पाळ्यांमध्ये ड्युटी
पावसाळ्यादरम्यान झाडांची पडझड, पाणी साचणे, अपघात, वाहतूक कोंडी इत्यादी विविध कारणांसाठी नियंत्रण कक्षांकडून नागरिकांना मदत मिळू शकते. नियंत्रण कक्षातील अधिकरी आणि कर्मचारी तीन पाळ्यांमध्ये कार्यरत असतील.

हेल्पलाईन क्रमांक
नियंत्रण कक्षातर्फे हेल्पलाईन क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत. ०२२-२६५९१२४१, ०२२-२६५९४१७६, ८६५७४०२०९० आणि १८००२२८८०१ (टोल फ्री) क्रमांकावर १ जूनपासून मदत मिळू शकेल.

सद्यस्थितीत सुरू असलेले प्रकल्प
२०२२ च्या अखेरीस मुंबई उपनगरातील पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग प्राधिकरणामार्फत महापालिकेस हस्तांतरित करण्यात आले आहेत. प्राधिकरणामार्फत मेट्रो रेल प्रकल्पांची कामे, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प, सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड विस्तार प्रकल्प, ऐरोली-काटई नाका जोडरस्ता व भुयारी मार्ग, शिवडी-वरळी उन्नत मार्ग, पूर्व द्रुतगती महामार्गावरील छेडा नगर जंक्शन सुधारणा प्रकल्प आणि मुंबई महानगर प्रदेशातील विस्तारित एमयूआयपी / ओएआरडीएसअंतर्गत विविध रस्ते, पूल व उड्डाणपूल अशा विविध प्रकल्पांची कामे सुरू आहेत.

सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना सर्व संबंधित कंत्राटदारांना देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये प्रकल्पाच्या ठिकाणी सुयोग्य बेरिकेडिंग करणे, खराब झालेल्या रस्त्यांची डागडुजी करणे, रस्त्यावर वेळोवेळी जमा होणारा चिखल काढून टाकणे इत्यादी सूचनांचा समावेश आहे. सांडपाणी वाहून नेण्याची सोय नाही आणि जिथे पाणी जास्त प्रमाणात साचण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी अतिरिक्त क्षमता असणारे पाण्याचे पंप उपलब्ध करून देण्याचे निर्देश कंत्राटदारांना देण्यात आले आहेत.
- एस. व्ही. आर. श्रीनिवास, महानगर आयुक्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

Asia Cup Final: स्मृती मानधना - शफली वर्माचे तब्बल तीन वर्ल्ड रेकॉर्ड! भारताचे श्रीलंकेसमोर भलंमोठं लक्ष्य

Mohol drought crisis: मोहोळ तालुका दुष्काळाच्या गडद छायेत; खरीप-रब्बी हंगाम उद्ध्वस्त, चारा टंचाईने शेतकरी आर्थिक कोंडीत

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं जाणून घ्या एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT