मुंबई

मुंबई-गोवा ‘वंदे भारत’ला अखेर मुहूर्त

CD

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ३१ : राज्यातील पाचवी आणि मुंबई ते गोव्यादरम्यान धावणाऱ्या पहिल्या हायस्पीड ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसला अखेर मुहूर्त मिळाला असून, ती येत्या शनिवारपासून (ता. ३) धावणार आहे. या एक्स्प्रेसचे उद्‍घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे करणार आहे. उद्‍घाटनानंतर ५ जूनपासून ही एक्स्प्रेस प्रवाशांच्या नियमित सेवेत दाखल होणार आहे. मंगळवारवगळता आठवड्यातून सहा दिवस ही एक्स्प्रेस धावणार असल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

प्रवाशांना वेगवान, सुरक्षित, सर्व सोयीसुविधांनी युक्त आरामदायी प्रवास व्हावा, या दृष्टीने भारतीय रेल्वेने ‘मेक इन इंडिया’अंतर्गत देशभरात हायस्पीड ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस सुरू केल्या आहेत. प्रत्येक राज्यातून वंदे भारत चालविण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची योजना आहे. महाराष्ट्रात सध्या चार वंदे भारत एक्स्प्रेस धावत असून, मुंबई-गोवाच्या रूपाने आता राज्याला पाचवी वंदे भारत एक्स्प्रेस मिळाली आहे. १६ मे रोजी सीएसएमटी-मडगांव दरम्यान ‘वंदे भारत’ची चाचणी घेण्यात आली. यशस्वी चाचणी आणि महत्त्वाच्या तांत्रिक बाबी तपासणीनंतर अखेर ५ जूनपासून ही सुपरफास्ट एक्स्प्रेस प्रवाशांच्या सेवेत येणार आहे.

संभाव्य वेळापत्रक
वंदे भारत एक्स्प्रेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून सकाळी ५.३५ वाजता सुटेल. ठाण्याला ६.०५, पनवेल ६.४०, खेड ८.४०, रत्नागिरी १०, मडगाव दुपारी १.२५ ला पोहोचेल. मडगाव येथून वंदे भारत दुपारी २.३५ वाजता सुटेल. परतीच्या प्रवासात रत्नागिरीतील तिची वेळ ५.३५ आहे; तर सीएसएमटी येथे ही एक्स्प्रेस रात्री १०.३५ वाजता पोहोचेल. याशिवाय मंगळवारवगळता सर्व दिवस ही एक्स्प्रेस धावणार आहे. भारतीय रेल्वेकडून तिचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले नसले, तरी हेच वेळापत्रक लागू होऊ शकते, अशी माहिती रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’ला दिली.

काय आहेत तिकीट दर?
मुंबई ते गोवा दरम्यान धावणाऱ्या ‘वंदे भारत’च्या चेअर कारचे तिकीट दर १ हजार ५८० रुपये आणि एक्झिक्युटिव्ह चेअर कारचे दर २ हजार ८७० रुपये आहेत. हे तिकीट दर सर्वसामान्य प्रवाशांच्या आवाक्याबाहेर असणार असले, तरी प्रवाशांच्या प्रतिसादानुसार यात बदल होण्याची शक्यताही रेल्वे अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

उद्घाटनाचे वेळापत्रक -
मडगाव - सकाळी १०.३० वा.
करमाळी - सकाळी ११.००/११.०२ वा.
थिवीम - सकाळी ११.१५/११.१७ वा.
कणकवली - दुपारी १२.१५/१२.१७ वा.
रत्नागिरी - दुपारी १.४०/१.४५ वा.
चिपळूण - दुपारी २.४५/२.४७ वा.
खेड - दुपारी ३.००/३.०२ वा.
कोलाड - दुपारी ४. ००/४. १६ वा.
पनवेल - सायंकाळी ४. ४५/४.४७ वा.
ठाणे - सायंकाळी ५.२०/५.२२ वा.
दादर - सायंकाळी ५. ५० /५. ५२ वा.
सीएसएमटी - सायंकाळी ६ वाजता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानी लष्करावर हल्ला करण्याचा कट! कर्नाटकात तरुणाला अटक; कोण आहे असफुल मलिक?

घरात काम करणारीच्या मानेवर लव्ह बाइट; तिने बॉयफ्रेंडचं नाव सांगताच पूजा बेदी झालेली शॉक; निघाला अभिनेत्रीचा...

IND vs SL, 1st Test: टी ब्रेक संपला, केएल राहुल मैदानात आला, पण एकही बॉल न खेळला रिटायर्ड हर्ट झाला... नेमकं घडलं काय?

Marathi News Live Updates : भारताकडून वेल्सचा ३-१ असा पराभव

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे जेवायला रेस्टॉरंटमध्ये गेले, ताटात नकली पनीर आढळलं; पुढे काय झालं? आयुक्तांनी कारवाईचा किस्साच सांगितला!

SCROLL FOR NEXT