मुंबई

परराज्यातील फणसाची वाशीत आवक

CD

वाशी, ता.१ (बातमीदार)ः वाशीतील घाऊक बाजारात कच्च्या फणसाची वर्षभर आवक होत असते. कर्नाटक, तामिळनाडूमधून एक ते दोन गाड्या बाजारात येतात. हा फणस ग्राहक भाजीसाठी घेऊन जातात. मात्र, उन्हाळ्यात पिकलेला फणस सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
उन्हाळ्यापासून बाजारात पिकलेल्या फणसाच्या दोन ते तीन गाड्या बाजारात यायला सुरुवात होते. कोकणातील फणस म्हणून फणसाची ओळख असली, तरी सध्या मुंबईच्या बाजारात मात्र दक्षिण भारतातून फणसाची मोठी आवक होत असते. वटपौर्णिमेसाठी मात्र कोकणातूनही फणस बाजारात येतो. त्यामुळे फणसाची आवक वाढते. वाशीच्या एपीएमसी मार्केटमध्ये गुरुवारी (ता. १) १३४ टन फणसांची आवक झाली आहे. सध्या घाऊक बाजारात कच्च्या फणसाचे दर २० ते २५ रुपये किलोपर्यंत आहेत, तर पिकलेल्या फणसाचे दर १६ ते ३६ रुपये किलो आहेत. वटपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर घाऊक बाजारात कच्च्यासोबत पिकलेल्या फणसाची आवक आणखी वाढणार असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
-------------------------------------
कोकणातून येणारा फणस काटेरी असतो, तर दक्षिण भारतातून येणारा फणस हा मोठा आणि गोल काट्यांचा असतो. त्यामुळे ते टोचत नाहीत. यातील गरेही मोठे असतात. यात कापा जातीचाच फणस अधिक असतो. त्याला चांगली मागणी असते.
- प्रदीप बोरकर, विक्रेते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT