मुंबई

महिला सक्षमीकरणासाठी बदलापुरात ‘स्त्री शक्ती समाधान’ शिबिर

CD

बदलापूर, ता. १ (बातमीदार) : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त तहसीलदार कार्यालय अंबरनाथ व महिला बालविकास विभाग अंबरनाथ ग्रामीण यांच्या संयुक्त विद्यमाने बदलापूर पूर्व कात्रप चौकातील श्री जी सभागृहात, एक दिवसीय स्त्री शक्ती समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिलांसाठी शासकीय योजना व लाभ यांची माहिती देण्यासाठी १९ स्टॉल लावण्यात आले होते. यावेळी तहसीलदार प्रशांती माने यांच्यासह नायब तहसीलदार व बदलापूर पूर्वचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल पडवळ उपस्थित होते.
शिबिरात लावण्यात आलेल्या स्टॉलमध्ये महसूल विभागाकडून शिधापत्रिका काढणे, तहसील, पंचायत कार्यालयातून काढण्यात येणारे दाखले, कृषी विभागाकडून देण्यात येणाऱ्या कर्ज व व्यवसायासाठी प्रशिक्षण योजना व सुविधा, महिला आर्थिक विकास महामंडळाकडून महिलांचे बचत गट स्थापन करणे व त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी लागणाऱ्या योजना, आरोग्य विभाग पंचायत समितीकडून गर्भवती आणि मुलींसाठी देण्यात येणाऱ्या योजना, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयातील बाल संरक्षण कक्षाकडून बालवयातील मुलींचे अधिकार, त्यांच्या संरक्षणासाठी असलेले कायदे व योजना या महत्त्वपूर्ण विषयांची माहिती देण्यात आली. यावेळी तहसीलदार व इतर उपस्थित प्रशासकीय अधिकाऱ्यांनी स्वतः या स्टॉलला भेट दिली. अनेक महिलांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला. यावेळी वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल पडवळ यांनी स्त्रियांवरील वाढते अन्याय व सायबर क्राईमपासून बचावासाठी पोलिस खात्याकडून देण्यात आलेल्या सुविधा व मदत केंद्र, तसेच संपर्क क्रमांक यांची माहिती देत महिलांना निडर राहून अन्यायाला वाचा फोडण्याचे आवाहन यावेळी केले आहे.
...
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर या दूरदृष्टिकोन असणाऱ्या, उत्तम प्रशासक होत्या. युद्धकलेत निपुण असणाऱ्या अहिल्याबाईंनी सामाजिक स्तरावर प्रतिकूल परिस्थितीत महिलांसाठी विशेष कार्य केले. त्यामुळे त्यांना राजमाता संबोधले जाते. त्यांचा हाच आदर्श डोळ्यांसमोर ठेवून एक महिला प्रशासकीय अधिकारी म्हणून महिलांसाठी उपलब्ध शासकीय योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा प्रयत्न केला आहे. यापुढे वेगवेगळ्या माध्यमातून, प्रत्येक घटकातील प्रत्येक स्त्रीपर्यंत याची माहिती व या योजनांचा लाभ प्रत्येक महिलेला घेता यावा यासाठी असे अनेक कार्यक्रम राबविण्यात येतील.
- प्रशांती माने, तहसीलदार, अंबरनाथ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'सदरक्षणाय खलनिग्रहणाय'ला काळीमा? लॉकअपमध्ये असलेल्या आरोपीकडे मुलीला ‘एका रात्रीसाठी’ पाठवण्याची कथित मागणी

IPL 2026: श्रेयस अय्यरवर BCCI ची मोठ्या किंमतीच्या दंडाची कारवाई; PBKS vs GT सामन्यात झालेली चूक

Pune Municipal Property: पुणे महापालिकेच्या ताब्यातील चार हजार मिळकती बेवारस; प्रॉपर्टी कार्डवर नोंदच नाही, मालमत्ता विभागाचे दुर्लक्ष!

IPL 2026 PKBS vs GT : गुजरातविरुद्ध सामन्यात पंजाब किंग्जला विजय मिळून देणारा कूपर कोनोली नेमका कोण? रिंकी पाँटिंगशी आहे खास कनेक्शन...

Mumbai News: प्रामाणिक कामगिरीतूनच यश; उद्योगमंत्री उदय सामंत यांचे ‘यिन’ अधिवेशनात युवकांना मार्गदर्शन

SCROLL FOR NEXT