मुंबई

महिला स्वयंरोजगार

CD

‘तनिष्का’तर्फे महिलांसाठी
स्वयंरोजगार उपक्रम
विविध व्यवसायांबाबत मार्गदर्शन
मुंबई, ता. १ ः तनिष्का फाऊंडेशन आणि ‘माझा महाराष्ट्र’ यांच्यातर्फे महिलांना स्वतंत्र व्यवसाय सुरू करता यावा, यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत महिलांना वेगवेगळे स्वयंरोजगार आणि व्यवसाय सुरू करण्यासाठी माहिती, मार्गदर्शन व साह्य केले जाणार आहे.
टिफिन व्यवसाय, खाद्यपदार्थ स्टॉल, ब्युटीपार्लर, मेकअप, घरपोच सेवा, क्लास, विवाह मंडळ आणि लग्नाच्या ऑर्डर आदी अनेक बाबतींत व्यवसायाच्या संधी महिलांना उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे पाळणाघर, प्लेसमेंट व्यवसाय, मॉडेलिंग एजन्सी, इव्हेंट, नर्सिंग ब्यूरो आणि इतर व्यवसायांमध्येही चांगल्या संधी आहेत. प्रत्येक व्यवसायासाठी मुंबईत विभागवार मॅनेजमेंट कमिटी बनवली जाईल. त्या कमिटीवरील महिलांना विविध व्यवसायांची सर्व माहिती, कायदेशीर बाबी, संभाषण कौशल्य, संपर्क, व्यवसायसंधी कशा शोधाव्यात आदी सर्व गोष्टी शिकविल्या जातील. त्यानंतर संबंधित महिलांनी आपापल्या क्षमतेनुसार व्यवसाय सुरू करण्याबाबत योजना राबवण्यात येत आहे. यंदाच्या दिवाळीपर्यंत जास्तीत जास्त महिलांना उद्योजिका बनविण्याचे ध्येय ठेवून उपक्रमाला सुरुवात होत आहे. सुरुवात मुंबई आणि मुंबई उपनगरातून होईल. कमिटीसाठी निवड सुरू होणार असून इच्छुक महिला ‘सकाळ माध्यम समूहा’च्या तनिष्का सदस्या असणे गरजेचे आहे. त्यासाठी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे. संपर्क ः प्रथमा शिरोडकर ः ८८८८८७०४९६ / दीपक काळीद ः ९८२०३१७१५०.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT