मुंबई

मुंबईत उपकरप्राप्त १५ इमारती अतिधोकादायक

CD

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १ : म्हाडा आणि मुंबई महापालिका दर वर्षी मुंबईतील धोकादायक इमारतींची यादी जाहीर करते. यंदाच्या वर्षीही म्हाडाने केलेल्या सर्वेक्षणात मुंबईतील १५ इमारती धोकादायक आढळून आल्या आहेत. यंदाच्या धोकादायक इमारतींमध्ये गेल्या वर्षीच्या ७ इमारतींचा समावेश आहे. या इमारतीतील नागरिकांनी इमारत दुरुस्ती मंडळाकडून करण्यात येणाऱ्या कार्यवाहीला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारीतील मुंबई शहर बेटावरील जुन्या व मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त इमारतींचे नियमित पावसाळापूर्व सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले. यामध्ये १५ इमारती अतिधोकादायक आढळून आल्या आहेत. या इमारतींमध्ये ४२४ निवासी व १२१ अनिवासी असे एकूण ५४५ रहिवासी आणि भाडेकरू आहेत. मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळातर्फे केलेल्या कार्यवाहीनुसार १५५ निवासी भाडेकरू आणि रहिवाशांनी स्वतःच्या निवाऱ्याची पर्यायी व्यवस्था केली आहे; तर आतापर्यंत २१ रहिवाशांना संक्रमण शिबिरात स्थलांतरित करण्यात आले आहे. उर्वरित इमारतींमधील भाडेकरू आणि रहिवाशांना निष्कासनाच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सारखेनंतर आता ताटातली पोळीही महाग; एका महिन्यात गव्हाच्या दरात तब्बल २०० रुपयांची वाढ

Ganesh Chaturthi 2026: आपण गणपती बाप्पा म्हटलं की ‘मोरया’ का म्हणतो? या जयघोषामागे आहे एका गणेशभक्ताची कहाणी

Ahilyanagar Crime: खर्ड्यात तान्हाजी बोराडे खूनप्रकरणाचा दोन दिवसांत छडा; १८ वर्षीय तरुणासह तीन अल्पवयीन ताब्यात

Marathi News Live Updates : तलावातून निघते गणरायाची पालखी; रायगडच्या साले गावातील अनोखी परंपरा

पतीचा मंगळदोष दूर करण्यासाठी पत्नीच्या प्रायव्हेट पार्टला हळदी कुंकू लावून...; भोंदूबाबाकडून अघोरी कृत्य, हुंड्यासाठी छळ

SCROLL FOR NEXT