मुंबई

गांजाची विक्री करणारी महिला ताब्यात

CD

नवी मुंबई, ता. १ (वार्ताहर) : अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने खारघर सेक्टर-३४ बीमधील फरशीपाडा येथील घरावर छापा मारून गांजाची विक्री करणाऱ्या महिलेला ताब्यात घेतले. लक्ष्मी नाडार (वय ३६) असे या महिलेचे नाव असून पोलिसांनी तिच्याजवळ सापडलेला दोन किलो ४० ग्रॅम वजनाचा सुमारे ४० हजार रुपये किमतीचा गांजा जप्त केला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अतुल आहेर व त्यांच्या पथकाने खारघर फरशीपाडा येथील संशयित घरावर छापा मारून लक्ष्मी राठोड या महिलेला ताब्यात घेतले. त्यानंतर तिची झडती घेतली असता, तिच्याजवळ असलेल्या पिशवीमध्ये दोन किलो ४० ग्रॅम वजनाची गांजाची पाने, फुले, काड्या व बिया असलेला गांजा आढळून आला. गांजाची विक्री करणाऱ्या लक्ष्मी नाडर या महिलेविरोधात खारघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून तिला ताब्यात घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Paithan News: सिलिंडरच्या टंचाईवर बायोगॅसची मात; पाचलगावच्या महिलेचा उपक्रम; कृषी विभागाच्या मदतीने उभारले संयंत्र

Nagpur News: युद्धाच्या झळांनी ग्रामीण भाग होरपळतोय; डिझेलअभावी शेतीकामात अडथळा: पेट्रोल पंपावर वाहनधारकांनी गर्दी

Latest Marathi News Live Update : भोंदू अशोक खरातला आज नाशिक जिल्हा न्यायालयात करणार हजर

Supreme Court: सुट्टीवर कोर्टाचा मोठा निर्णय! धार्मिक स्वातंत्र्याला मर्यादा, देशभर सुट्टीची मागणी फेटाळली

Washim News: महामार्गांवरील वृक्षतोडीला थांबवा; शहरातील नागरिकांची न्यायालयात धाव; शंभर वर्ष जुन्या वृक्षावार घाला

SCROLL FOR NEXT