मुंबई

डिलाईल पुलाची एक मार्गिका खुली

CD

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १ : लोअर परळ, वरळी, प्रभादेवी आणि करीरोड, भायखळा परिसरातील वाहतुकीचा कणा असलेल्या लोअर परळ (डिलाईल रोड) पुलाची पश्चिमेकडील मार्गिका आजपासून वाहनचालकांसाठी खुली करण्यात आली. ही मार्गिका खुली झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे; तर उर्वरित टप्प्यातील पूर्व दिशेचा पूल जुलैअखेरीस पूर्ण होऊन वाहतुकीसाठी संपूर्ण क्षमतेने खुला होईल, अशी माहिती देण्यात आली.

लोअर परळ पुलाचे काम वेगाने पूर्णत्वास नेण्यासाठी पालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांचे निर्देश होते. पावसाळ्यापूर्वी नागरिकांना दिलासा मिळावा म्हणून उपायुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले यांनी संपूर्ण कामाचा पाठपुरावा केला. आगामी कालावधीत पूर्वेकडील पुलाचा भाग हा नागरिकांना वापरासाठी उपलब्ध होईल. यासाठीच्या सूचना पूल विभागाचे प्रमुख अभियंता संजय कौंडण्यपुरे यांनी केल्या आहेत.

डिलाईल रोड पुलाच्या कामातील पूर्वेच्या दिशेची काही कामे आगामी कालावधीत पूर्ण होणे अपेक्षित आहे. यामध्ये वाहतुकीसाठीच्या रॅम्पचे तसेच काँक्रीटीकरण, डांबरीकरण, पथदिवे, रंगकाम आदी कामे समाविष्ट आहेत. ही कामे पूर्ण करून पूर्व दिशेची मार्गिका जुलैअखेरीस सुरू करण्याचा पालिकेच्या पूल विभागाचा प्रयत्न असणार आहे.

पुलाखाली अतिरिक्त भुयारी मार्ग
जुना लोअर परळ पूल हा मातीचा भराव आणि दगडी बांधकामाद्वारे बांधण्यात आला होता. त्यामुळे बाजूचे सेवा रस्ते (सर्व्हिस रोड) अरुंद होते. तसेच पोहोच मार्गामधून क्रॉसिंगसाठी फक्त एक भुयारी मार्ग उपलब्ध होता; परंतु आता नव्याने बांधण्यात येणारा लोअर परळ पूल स्टील गर्डर वापरून बांधण्यात येत असल्यामुळे पुलाखाली क्रॉसिंगसाठी मुबलक जागा उपलब्ध असणार आहे. तसेच बाजूचे सेवा मार्ग हे पूर्वीपेक्षा रुंद असणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाणी देता का पाणी? नसेल तर गाव विकायचंय, आम्ही कर्नाटकात जातो; सोलापूर, सांगलीतले गावकरी आक्रमक

AI मुळे १ अब्ज लोकांचा मृत्यू? बिल गेट्स यांचा गंभीर इशारा, नेमकं काय सांगितलं?

मग काय करणार? गणपती विसर्जनावेळी चक्क साडी नेसून नदीत पोहली मराठमोळी गायिका; Video पाहून तुम्हीही थक्क व्हाल

Ajintha ST Accident: अजिंठ्यात एसटी बसचा थरारक अपघात; ट्रेलरला मागून धडक, २० हून अधिक प्रवासी जखमी

Latest Marathi News Live Update : टीएमसीच्या पक्ष आणि चिन्हाबाबतचा वाद तीन महिन्यात निकाली काढण्याचे निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टाचे निर्देश

SCROLL FOR NEXT