मुंबई

जितेंद्र आव्हाडांविरोधात जोडो मारो आंदोलन

CD

उल्हासनगर, ता. १ (वार्ताहर) : राष्ट्रवादी काँग्रेसने उल्हासनगरात आयोजित केलेल्या आढावा बैठकीत माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सिंधी समाजाबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. आव्हाड यांचे बोलणे त्यांना भोवले असून त्यांच्याविरुद्ध शिवसेना, भाजपने आंदोलन केले आहे; तर भाजपने दिलेल्या तक्रारीवरून जितेंद्र आव्हाड यांच्यावर हिललाईन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२७ मे २०२३ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस उल्हासनगर शहर जिल्ह्याच्या वतीने आढावा बैठक व सार्वजनिक प्रवेश कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत कार्यकर्त्यांना संबोधित करताना राष्ट्रवादीचे नेते डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी सिंधी समाजाविषयी आक्षेपार्ह विधान केले होते. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या गंगोत्री गटाला निमंत्रण देण्यात आलेले नव्हते. त्यामुळे संतप्त झालेल्या गंगोत्री यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जितेंद्र आव्हाड, माजी खासदार आनंद परांजपे, पप्पू कलानी आणि ओमी कलानी यांचा निषेध व्यक्त केला होता. त्यानंतर त्यांनी वरील वक्तव्य केले. मात्र त्यामुळे सिंधी समाजाच्या भावना दुखावल्या होत्या. त्यांच्या या कार्यक्रमाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. शिवसेना महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी, आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या नेतृत्वाखाली जितेंद्र आव्हाड यांच्या या वक्तव्याचा निषेध व्यक्त करून ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात आले. तसेच भाजपचे आमदार कुमार आयलानी, शहर अध्यक्ष जमनू पुरस्वानी यांच्या नेतृत्वाखाली नेहरू चौकात आंदोलन करण्यात आले आहे.


-----------------
भावना दुखावण्याचा हेतू नव्हता
जितेंद्र आव्हाड यांनी त्यांचे म्हणणे स्पष्ट केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका सिंधी नेत्याबाबत हे वक्तव्य केले होते, जो पक्षात राहूनदेखील पक्षविरोधी कारवाया करतो. या वक्तव्याला सिंधी समाजाशी जोडू नये, माझा कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता. माझे अनेक सिंधी मित्र आणि हितचिंतक असून मी समस्त सिंधी समाजाचा आदर करतो, असे त्यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT