मुंबई

५०० चौरस फूटाच्या घरांना मालमत्ता करमाफ

CD

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १ : ५०० चौरस फुटांच्या आकाराची घरे असणाऱ्या नवी मुंबईकरांना राज्य सरकारतर्फे मोठा दिलासा मिळाला आहे. ५०० चौरस फुटांच्या आकाराच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ऐरोलीचे आमदार गणेश नाईक, एमएमआरडीए आयुक्त श्रीनिवासन, राज्याचे प्रधान सचिव भूषण गगराणी, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी, एमआयडीसी, मेरी टाईम बोर्ड आणि नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांच्यासह विविध खात्याचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

नवी मुंबई महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने सर्वात प्रथम ठराव करून पालिका हद्दीतील ५०० चौरस फूट क्षेत्रफळापर्यंतच्या निवासी घरांना मालमत्ता कर माफ केला आहे. ठराव राज्य सरकारच्या मंजुरीसाठी पाठवून दिला आहे; मात्र त्यावर अद्याप सरकारने निर्णय घेतला नव्हता. त्यामुळे या प्रस्तावाकडे सर्व नवी मुंबईकरांच्या नजरा खिळल्या होत्या. त्याचबरोबर ५०१ ते ७०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना ६० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. महासभेने ठराव केल्यानंतर त्याबाबतचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने अंतिम मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठवला होता. त्या प्रस्तावाला मंजुरी देण्याची मागणी नाईक यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे बैठकीत केली. या मागणीवर निर्णय देत अत्यावश्यक कर आकारणी करून ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना ठाण्याच्या धरतीवर करमाफी देण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिले.


———————
ऐरोली-काटई उन्नत येथे मार्गिका
मुंबई आणि कल्याण-डोंबिवलीला जोडणारा ऐरोली-काटई उन्नत मार्ग नवी मुंबईतून जातो. मात्र या मार्गावर नवी मुंबईमध्ये चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी मार्ग ठेवले नाहीत, तर या प्रकल्पाचा लाभ नवी मुंबईकरांना होणार नाही. त्यामुळे काटई आणि मुंबई दोन्ही बाजूने चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी मार्गिका ठेवण्याची मागणी आमदार नाईक यांनी लावून धरली आहे. हा प्रकल्प पूर्ण होण्याअगोदर या मार्गावर दोन्ही बाजूला स्वतंत्र मार्गिकांचे काम पूर्ण करावे, अशी मागणी नाईक यांनी बैठकीत केली. यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी एमएमआरडीएने स्वखर्चाने मार्गिका बांधून देण्याचे निर्देश दिले.


——————
बैठकीत झालेले महत्त्वाचे निर्णय
- ऐरोली-काटई मार्गावर नवी मुंबईकरांसाठी चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी मार्गिका
- सिडकोच्या सुविधा भूखंडांच्या हस्तांतरणाबाबत सकारात्मकता
- ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर होणार माफ
- तुर्भे पारसिक बोगद्याचे काम लवकरच सुरू होणार
- प्रकल्पग्रस्तांना मालकी हक्क देण्यासाठी सर्वेक्षण होणार
- बीएमटीसीच्या पात्र कामगारांना मिळणार १०० चौरस फुटाचे भूखंड
- रेल्वेरुळांच्या बाजूने संरक्षक भिंती उद्या करणार
- शेवटी न्हावा-शेवा प्रकल्पग्रस्तांना नुकसानभरपाई अदा करणार
- अपघाताला कारणीभूत ठरणारी सर्व्हिस रोडच्या बाजूची बांधकामे तोडणार
- दिवा जेटीच्या विकासासाठी ३२ कोटीचा निधी मंजूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

Latest Marathi News Update: पुण्यात १० मे रोजी राज ठाकरेंची सभा; मोहोळ यांचा करणार प्रचार

ICC Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारत पाकिस्तानात जाणार? बीसीसीआयनं स्पष्टच सांगितलं

Viral Video: 'बाबा वारले,आई सोडून गेली..' रोल विकणाऱ्या १० वर्षांच्या मुलाची हिंमत पाहून भारावले आनंद महिंद्रा, केली मोठी घोषणा

Bomb Hoax in 16 Schools: मतदानादिवशी 16 शाळांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी! रशियातून आला ईमेल ? पोलिसांचं धाबं दणाणलं

SCROLL FOR NEXT