मुंबई

मुंबई विमानतळावर सहा कोटींचे सोने जप्त

CD

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ५ : महसूल गुप्‍तचर संचालनालयाने (डीआरआय) छत्रपती शिवाजी महाराज मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर केलेल्या दोन कारवायांमध्ये सुमारे १० किलोहून अधिक सोने जप्त केले आहे. याप्रकरणी एका महिलेसह चौघांना अटक करण्यात आली आहे. जप्त केलेल्या सोन्याची किंमत सहा कोटी रुपये आहे.

आखाती देशातून सोन्याच्या तस्करीबाबत मिळालेल्या माहितीच्या आधारे डीआरआयने शनिवारी (ता. ३) मुंबई विमानतळावर सापळा रचला होता. त्यानुसार शारजाह येथून मुंबई विमानतळावर दाखल झालेल्या मोहम्मद उमर फजलवाला व फहिम वारेवरिया (दोघेही रा. सुरत- गुजरात) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे सुमारे ८ किलो सोने (किंमत ४ कोटी ९४ लाख रुपये) सापडले. त्यांच्या चौकशीतून डीआरआयने मुजदसर डोजकी (जामनगर- गुजरात) याला अटक केली. फजलवाला व वारेवरिया दोघेही १ जूनला शारजाहला गेले होते. तेथून ते दोघेही सोने घेऊन आले होते.

डीआरआयच्या दुसऱ्या कारवाईत दुबईहून आलेल्या दाम्पत्याला मुंबई विमानतळावर थांबवण्यात आले. दाम्पत्यापैकी अफजल अबुबकर वल्लाह याच्याकडे सुमारे २ किलो सोने (किंमत १ कोटी २३ लाख रुपये) सापडले. त्याच्यासोबत असलेल्या महिलेच्या पाकिटांमध्ये सोने लपवले होते, ते जप्त करण्यात आले असून सीमा शुल्क कायद्यांतर्गत अफजलविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT