मुंबई

दिवा रत्नागिरी पॅसेंजरचा सीएसएमटी- दादरपर्यंत विस्तार करा!

CD

दिवा-रत्नागिरी पॅसेंजर गाडीचा
दादर-सीएसएमटीपर्यंत विस्तार करण्याची मागणी
मुंबई, ता. ६ : रत्नागिरी-दादर पॅसेंजर गाडी आता दिवा रेल्वेस्थानकातून सुटत असल्याने पश्चिम उपनगरात राहणाऱ्या कोकणवासीयांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे दिवा-रत्नागिरी पॅसेंजर रेल्वेगाडीचा विस्तार दादर किंवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत करण्याची मागणी प्रवासी संघटनेकडून करण्यात आली आहे.
झीरो बेस्ड टाइमटेबल अंतर्गत यापूर्वीची रत्नागिरी-दादर अशी धावणारी पॅसेंजर गाडी सध्या दिवा स्थानकापर्यंतच चालवण्यात येत आहे. परिणामी प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. त्याचबरोबर मध्य रेल्वेने रत्नागिरी-दादर पॅसेंजरचे दिवा-रोहा मार्गावरील जवळपास नऊ थांबे रद्द केले आहेत; मात्र प्रवासाचा वेळ वाचलेला नाही. पनवेलमध्ये पाणी भरण्यासाठी दिवा-रत्नागिरी पॅसेंजर ३० ते ४५ मिनिटे थांबवावी लागते. गाडीच्या सुरुवातीच्या स्थानकातच पाणी भरले गेले पाहिजे, अशा रेल्वे बोर्डाच्या सूचना असूनही त्याचे पालन केले जात नाही. नऊ थांबे कमी करूनही गाडीच्या प्रवास वेळेत काहीही घट झालेली नाही. एकूण प्रवास वेळेत केवळ १० ते २० मिनिटे कपात झाली आहे. प्रत्यक्षात एका थांब्यासाठी ८-१० मिनिटे गृहित धरल्यास किमान एक तासाची घट अपेक्षित होती. त्यामुळे मध्य रेल्वेने डाऊन दिशेने जाणाऱ्या दादर-रत्नागिरी पॅसेंजर गाडीत दिव्यासाठी काही अनारक्षित डबे निश्चित करून ती दादर किंवा सीएसएमटीपर्यंत वाढवण्याची मागणी रेल्वे अभ्यासक अक्षय महापदी यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tembhurni Crime : गाडी पार्किंगच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एकाचा चाकूने भोसकून खून; दोन संशयित आरोपींना अटक

Degloor Crime : बनावट ग्राहकाच्या सापळ्यात मोटारसायकल चोर जेरबंद; १० चोरीच्या दुचाकींसह एक आरोपी ताब्यात, एक फरार

Badnapur News : ‘साहेब, शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, जनावरांसाठी चारा द्या’; वरुडीतील शेतकऱ्यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आर्जवी मागणी

Nagpur Crime : दारुड्या प्रवाशाचा हायव्होल्टेज ड्रामा! दारूच्या नशेत पकडली ठाण्यात पोलिसाची कॉलर

Gujarat UCC: गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यास राष्ट्रपतींची मंजुरी; काय असेल नियमावली?

SCROLL FOR NEXT