मुंबई

सिंधी समाजाकडून कोपरी बंद

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ५ : राष्ट्रवादीचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी आक्षेपार्ह विधान केल्याच्या निषेधार्थ ठाण्यातील सिंधी समाजाने सोमवारी कोपरी ठाणे पूर्वमध्ये कडकडीत बंद पुकारला. तसेच सिंधी समाजासह कोपरीतील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी कोपरी पोलिस ठाण्यात निवेदन दिले. या निवेदनात आव्हाडांची ब्रेन मॅपिंग तसेच नार्को टेस्ट करून त्यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.
उल्हासनगर कॅम्प ५ येथील नेताजी चौकात उल्हासनगर राष्ट्रवादीच्या वतीने २७ मे रोजी आयोजित केलेल्या कार्यक्रमात माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सिंधी समाजाबाबत वादग्रस्त विधान केल्याचा आरोप होते आहे. दरम्यान या वक्तव्यानंतर उल्हासनगर तसेच ठाण्यातील सिंधी बांधव आक्रमक झाले आहेत. एका लोकप्रतिनिधीला अशी भाषा शोभत नाही. असा आरोप करीत कोपरीतील सिंधी समाजाने दोनच दिवसांपूर्वी निषेध सभा घेऊन कोपरी बंदची हाक दिली होती. त्यानुसार, सोमवारी संपूर्ण कोपरी मार्केटमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी भाजपचे माजी नगरसेवक भरत चव्हाण, शिवसेनेचे हेमंत पमनानी, प्रकाश कोटवानी तसेच, दीपक घनशानी आदी समवेत समस्त सिंधी समाजातील नागरीकांनी कोपरी पोलिस ठाण्यावर मोर्चा काढून जोपर्यत आव्हाड माफी मागत नाहीत तोपर्यत आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्धार केला.

व्हिडीओची फॉरेन्सिक तपासणी करावी
सिंधी समाजाचे नेते दीपक घनशानी यांनी, व्हिडीओ मॉर्फ केल्याच्या आव्हाडांच्या आरोपांना उत्तर दिले. संबधित आक्षेपार्ह व्हिडीओ मॉर्फ असेल तर त्याची फॉरेन्सिक तपासणी करावी. त्याचबरोबर आव्हाडांची ब्रेन मॅपिंग करून नार्को टेस्टही करावी. त्यात जर आव्हाड दोषी आढळले तर त्यांची आमदारकी रद्द करावी अशा मागणीचे निवेदन राज्याचे प्रधान सचिव आणि विधानसभा अध्यक्षांना देण्यात आल्याचे घनशानी म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH Live Score: हार्दिकने जिंकला टॉस! मुंबईकडून 'या' खेळाडूचे पदार्पण, तर हैदराबाद संघातही मोठा बदल; पाहा प्लेइंग-11

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

Disha Patani : दिशाच्या बिकिनी लुकचा सोशल मीडियावर धुमाकूळ; फोटो पाहून नेटकरी म्हणाले...

Gautam Gambhir: 'KKR जिंकल्यावर गंभीरचे कौतुक अन् हरल्यावर श्रेयसची चूक?' दिग्गज क्रिकेटरच्या पोस्टने उडवली खळबळ

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT