मुंबई

शारीरिक व्यंगत्वावर मात करत समृद्धीची भरारी

CD

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ६ : आपल्या मुलाने स्वतःच्या पायावर उभे राहावे, चांगले शिक्षण घेऊन करिअर करावे अशी प्रत्येक पालकांची इच्छा असते. परंतु काही कारणामुळे विशेष मुल जन्माला आले तर त्याचा संपूर्ण भार हा पालकांवर येत असतो. आपल्यापाठी आपल्या मुलाचे कसे होणार ही चिंता पालकांना सतावत असतानाच समृद्धीच्या पालकांची मात्र चिंता दूर झाली आहे. शारीरीक व्यंगत्वावर मात करीत समृद्धीने दहावीच्या परीक्षेत समृद्ध असे यश संपादन केले आहे. ८२ टक्के गुण मिळवून समृद्धीने आपल्या पालकांची मान अभिमानाने उंचावली आहे.
डोंबिवलीतील स. वा. जोशी शाळेत विशेष विद्यार्थी म्हणून शिक्षण घेणाऱ्या समृद्धी कुलकर्णी हिने दहावीत ८२ टक्के गुण प्राप्त केले आहेत. समृद्धीला चांगले मार्क मिळाल्याने तिच्या पालकांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. तिचे पालक सांगतात समृद्धी विशेष पाल्य असल्याचे लक्षात आल्यानंतर तिच्यासाठी विविध गोष्टी आम्ही केल्या आहेत. तिच्या आवडी निवडी, तिला तिच्या पायावर उभे करणे, थोडे चालायला शिकवणे या सगळ्या गोष्टी करत होतोच. शिवाय तिचा बौद्धिक विकास व्हावा यासाठी तिचे नाव स. वा. जोशी शाळेत नोंदवले. तिच्या शिक्षणाचे स्वप्न आम्ही पाहत होतो. आमचे हे स्वप्न तिने तिच्या दहावीच्या टप्प्यावर पूर्ण केले असल्याचे तिची आई सांगते. विशेष मुलांसाठी बोर्डाकडून काही विषय असतात. मराठी, इंग्रजी, फिजिओलॉजी हायजिन अँड होम सायन्स, सोशल सायन्सेस, एरिथमॅटिक, कुकरी असे विषय असतात. कुकरी मध्ये समृध्दीने स्वतःच्या हाताने उत्कृष्ट सँडविच बनवले होते. त्याचबरोबर बाकीच्या विषयांचा अभ्यास आम्ही तिच्याकडून करून घेतला.

शिक्षकांनीही घेतली मेहनत
शाळेतील शिक्षकांनी देखील तिच्यावर लहानपणापासून विशेष मेहनत घेत होते. तिची अभ्यासातील प्रगती पाहता तिचे शिक्षक दोन तास घरी येऊन तिला शिकवीत होते. आज या सगळ्या मेहनतीच्या जोरावर तिने दहावीच्या परिक्षेत उत्तम मार्क मिळवले आहेत. पुढेही तिला चांगले शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर तिला उभे करणार आहोत असे समृद्धीचे पालक सांगतात.
....
शिवाजी बालक शाळेचा शंभर टक्के निकाल
डोंबिवली (बातमीदार) : डोंबिवली पूर्व येथील शिवाजी बालक ट्रस्ट संचालित शिवाई बालक मंदिर या शाळेने दहावीच्या परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. यात साक्षी कृष्णा पडोळ ९३.६०%, गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. तर आदिती अनंत बेंडल ९१.२०%, श्रद्धा गणेश शिंदे ८९.४५% अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला आहे. यंदा शाळेतून ९५ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. संस्थेतर्फे यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि मार्गदर्शक शिक्षक व पालकांचे अभिनंदन करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT