मुंबई

गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप

CD

वासिंद, ता. ६ (बातमीदार) : रोटरी क्लब ऑफ मुंबई मिडवेस्ट, आदिवासी उन्नती मंडळ मुंबई, आणि इनरव्हील क्लब ऑफ मुंबई मिडवेस्ट यांच्यातर्फे शहापूर येथे विधवा गरजू महिलांना शिलाई मशिन व साडी वाटप करण्यात आले. रवींद्र भोईर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात सुधाकर पाटील यांनी स्वागत करून आयोजक संस्था १९८२ पासून शहापूर तालुक्यात करीत असलेल्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. तर डॉ. प्रीती पाठारे यांनी शिलाई मशिनचा सुयोग्य वापर करून महिलांनी स्वयंसिद्धा होण्याचे आवाहन केले. आदिवासी उन्नती मंडळाचे ट्रस्टी कमल चोक्षी यांनी लाभार्थी विधवा महिलांनी मदतीचा स्वीकार केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी करुणा पाटील (दहिवली), पुनम जत्ती (आसनगाव), शकुंतला भोईर (कळगाव), दिपाली विशे (शेलवली बां.) यांना अत्याधुनिक शिलाई मशिन व साडी वाटप करण्यात आले.
.....
वासिंद : गरजू महिलांना शिलाई मशिन व साडी वाटप करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलगा दत्तक घेणाऱ्या महिलांना मातृत्व रजेपासून वंचित ठेवणं असंवैधानिक, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय...

Jalgaon News : झाडांची कत्तल अन् तलावाची हानी! मेहरूण तलाव वाचवण्यासाठी पर्यावरणप्रेमी सरसावले

Dombivli: क्रिकेट खेळताना चिमुकल्यावर काळ ओढवला; हसत्याखेळत्या कुटुंबाची स्वप्न क्षणात उद्ध्वस्त, मुंबईत नेमकं काय घडलं?

Stock Market Today: शेअर बाजार तेजीत! हे शेअर्स चमकले; मात्र मोठ्या IPO ला ब्रेक का?

मोठी बातमी! ठाणे-मुलुंडदरम्यान नवे रेल्वे स्थानक उभारण्यास मंजुरी; स्टेशनला आनंद दिघेंचे नाव देण्याची खासदारांची मागणी

SCROLL FOR NEXT