मुंबई

ठाण्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

CD

ठाणे, ता. ६ (वार्ताहर) : शहरातील माजिवडा परिसरामध्ये राहणाऱ्या एका साडेसहावर्षीय मुलीवर एका ५५ वर्षीय व्यक्तीने अत्याचार केल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. याप्रकरणी कापूरबावडी पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला मुंबईच्या माहीम येथून अटक केली. तसेच आरोपी व्यवयायाने मिस्त्री असून तो बाळकुम परिसरात राहतो. आरोपी पीडितेच्या शेजारी राहत असल्याने आरोपीचे पीडित मुलीच्या घरी येणे-जाणे होते. सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास आरोपीने पीडित मुलीच्या घरी जाऊन तिच्यावर अत्याचार केला आणि तेथून पलायन केले. हे प्रकरण पीडित मुलीच्या घरच्यांना समजल्यावर त्यांनी कापूरबावडी पोलिस ठाण्यात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी तत्काळ आरोपीचा शोध सुरू केला. आरोपी चुरका शरन उर्फ दादू हा पश्चिम बंगालमध्ये पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. पोलिसांनी त्याला मुंबईच्या माहीम या परिसरातून अटक केली. आरोपीविरोधात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

उड्डाण घेतलं अन् थेट जमिनीवर कोसळलं; हेलिकॉप्टरचा अपघात; सहा जणांचा मृत्यू, कुठं घडली घटना?

Rajnath Singh Statement: धाकड' CM आता बनले 'धुरंधर'! २०२७ मध्ये लगावणार विजयाचा 'सिक्सर'; राजनाथ सिंह यांची मोठी भविष्यवाणी

सोशल मीडियाचा निष्पक्ष न्यायप्रक्रियेला धोका; सर्वोच्च न्यायालयाचं महत्त्वाचं निरीक्षण; व्यक्त केली गंभीर चिंता, काय म्हणाले?

Mumbai Indians: इस बार NO. 6... ! हिटमॅनच्या हातात माईक अन् हार्दिक-सूर्यासह फुंकले IPL 2026 साठी रणशिंग; Video Viral

Pune Crime: चाेरट्यांचा तब्बल २८ तोळे सोन्यावर डल्ला; आंबेगाव तालुक्यातील घटना, घरात काेणी नसल्याने साधला डाव!

SCROLL FOR NEXT