

Vaibhav Sooryavanshi | IND A vs SL A ODI
Sakal
India A vs Sri Lanka A Final) भारतीय अ संघाला रविवारी (२१ मे) श्रीलंका अ संघाविरुद्ध तिरंगी वनडे मालिकेतील अंतिम सामना खेळायचा आहे. हा सामना डंबुलला होणार आहे. श्रीलंकेने या मालिकेतील तीन सामने जिंकून, तर भारताने दोन सामने जिंकून अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. या मालिकेत भारत आणि श्रीलंका संघ तिसऱ्यांदा आमने-सामने असतील.
साखळी फेरीतील पहिल्या सामन्यात भारताने श्रीलंकेला पराभूत केलं होतं, त्यानंतर दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेने भारताला सुपर ओव्हरमध्ये पराभवाचा धक्का दिला. मात्र दुसऱ्या सामन्यात काही वाद झाल्याने त्याचे पडसाद अंतिम सामन्यात उमटण्याची शक्यताही वर्तवण्यात आली. त्यावर श्रीलंका अ संघाचा कर्णधार सहान अराच्चिगेने (Sahan Arachchige) प्रतिक्रिया दिली आहे.