मुंबई

मुंबई मेट्रो ५च्या सुधारित आराखड्यास राज्य सरकारची मंजुरी

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : मेट्रो मार्गिका ५ प्रकल्पातील धामणकर नाका ते टेमघर दरम्यानच्या मूळ नियोजित उन्नत मार्गिकेचा भूमिगत मेट्रो मार्गिकेत बदल करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. एमएमआरडीएने याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारला सादर केला होता.

राज्य शासनाने मुंबई मेट्रो रेल्वे मार्ग ५ ठाणे-भिवंडी-कल्याण या ८,४१७ कोटी रुपये किमतीच्या पूर्णतः उन्नत मेट्रो प्रकल्पाची एमएमआरडीएमार्फत उभारणी करण्यास २१ डिसेंबर २०१७ रोजी मान्यता दिली होती. प्रकल्पाच्या मूळ मंजूर डीपीआरनुसार या मेट्रो मार्गाची उन्नत मार्गिका ठाण्यातील कापूरबावडी येथून ठाणे-भिवंडी रस्त्याने भिवंडी शहरातील राजीव गांधी चौक येथून कल्याण रोड मार्गावरून राजनोली ते दुर्गाडीपर्यंत व त्यापुढे कल्याण शहरातून कल्याण-शीळ रोड मार्गे कल्याण एपीएमसीपर्यंत प्रस्तावित करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यातील ठाणे ते भिवंडी मार्गिकेचे ७९ टक्के भौतिक कामे पूर्ण झाली आहेत. तर टप्पा २ भिवंडी ते कल्याण मार्गिकेतील भिवंडी शहरातील राजीव गांधी चौक ते साईबाबा मंदीर, टेमघरपर्यंत सुमारे ३ कि. मी. लांबीमध्ये मोठ्या प्रमाणात पुनर्वसन व पुनर्वसाहतसंबंधी समस्या असल्यामुळे टप्पा-२ ची स्थापत्य कामे अद्याप हाती घेण्यात आलेली नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT