मुंबई

कल्याणमध्ये फ्री स्टाईल हाणामारी

CD

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ६ : कल्याणच्या पत्रीपुलाजवळ दोन दुचाकींची धडक झाल्याच्या कारणावरून दोन्ही दुचाकीस्वारांमध्ये हाणामारीचा प्रकार घडला. दोन्ही दुचाकीस्वार आणि त्यांच्या सोबत असलेल्या महिलांमध्ये फ्री स्टाईल हाणामारीचा व्हिडीओ सध्या समाजमाध्यामावर व्हायरल होत आहे. तब्बल वीस मिनिटे ही हाणामारी सुरू होती. अखेर पोलिसांच्या मदतीनंतर ही परिस्थिती नियंत्रणात आली. कल्याण पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा तिसाई माता पूल (पत्रीपूल) ते दुर्गाडी किल्ल्याला जोडणाऱ्या गोविंद बायपास रोडवर मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दोन दुचाकींची धडकेनंतर चूक कोणाची हे न पाहता दोन्ही दुचाकीस्वारांमध्ये भररस्त्यातच तुंबळ हाणामारी सुरू झाली. ही सर्व घटना वाहतूक पोलिसांसमोरच घडत होती. दरम्यान महिलांचे भांडण सोडवण्यासाठी इतर प्रवासी प्रयत्न करत होते, या वेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Price 1 May: सामान्यांना दिलासा! LPGच्या किमतीत मोठी घट, जाणून घ्या नवे दर

IPL 2024 MI vs LGS : मुंबईचा ‘प्लेऑफ’चा मार्ग खडतर ; लखनौचा विजय,स्टॉयनिसची चमक

Bicycle Crunches: सायकल क्रंच करताना 'या' चुका करू नका, जाणून घ्या योग्य पद्धत

Mumbai News: दुर्गम भागातील नाही, भांडुपमधील प्रकार! डॉक्टरांनी केली टॉर्चच्या प्रकाशात प्रसूती, महिलेसह बाळाचा मृत्यू!

Latest Marathi News Live Update : दररोज काहीतरी बोलणाऱ्यांना मी उत्तर देणार नाही- देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT