मुंबई

चर्चगेट भागात मुलीच्या हत्येचे गूढ

CD

चर्चगेटच्या वसतिगृहात
तरुणीचा विवस्त्र मृतदेह
सुरक्षारक्षकाचाही गूढ मृत्यू
मुंबई, ता. ६ : मुंबईतील चर्चगेट भागातील सावित्रीबाई फुले वसतिगृहामध्ये २१ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. संबंधित तरुणीचा मृतहेद विवस्त्र अवस्थेत आढळल्याने तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. मरीन ड्राईव्ह पोलिसांनी याप्रकरणी गुन्ह्याची नोंद केली आहे.
दरम्यान, वसतिगृहाच्या सुरक्षा रक्षकावर संशयाची सुई होती. पण, त्याचा मृतदेह चर्नी रोड-ग्रॅंट रोड स्थानकांच्या दरम्यान रेल्वे रुळावर सापडल्याने गूढ वाढले आहे. संबंधित तरुणी दोन दिवसांनी आपल्या घरी जाण्याच्या तयारीत होती, अशी माहिती पोलिसांनी दिली. वसतिगृहाचा सुरक्षा रक्षक प्रकाश कनोजिया घटनेनंतर फरार होता. त्याचा मोबाईल इमारतीत सापडल्याने पोलिस त्याच्या मागावर होते. पण, त्याचाही मृतदेह सापडला आहे. या प्रकरणी प्राथमिक चौकशी सुरू आहे. रात्री उशिरापर्यंत एफआयआर नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे मरिन ड्राईव्ह पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. प्राथमिकदृष्च्या पोलिसांनी बलात्काराची शक्यता वर्तवली आहे.
तरुणीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. सध्यातरी हत्येचा प्रकार वाटत आहे. शवविच्छेदन अहवालानंतर पोलिस तपासाची दिशा स्पष्ट होईल. सध्या आमची चौकशी सुरू आहे, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक अमोल पवळे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Transfers: महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका; प्रशासनात नवे समीकरण

PBKS vs RR Live : श्रेयस अय्यरचा अजंबित करणारा निर्णय; शुभमन गिलच्या संघाला दिली आयती संधी, जाणून घ्या संघांची Playing XI

Sambhaji Maharaj Descendants : शंभूराजांच्या आजोळ घराण्याचे वंशज काय करतात? छत्रपतींशी पिढ्यानपिढ्या जपले आहे रक्ताचे नाते

Dombivli Crime: आलिशान बंगल्यात मोठा शस्त्रसाठा अन्...; ‘गँगस्टर स्टाईल’ रील स्टारला पुन्हा अटक, ठाण्यात खळबळ

मुंबईचा 'Viv Richards' काळाच्या पडद्याआड! क्रिकेटपटू अनिल गुरव यांचे निधन; आचरेकर सरांचा आवडता खेळाडू, सचिनही त्यांना 'सर' म्हणायचा...

SCROLL FOR NEXT