मुंबई

आपत्कालीन परिस्थितीसाठी सज्ज रहा

CD

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ७ ः पावसाळ्यात आपत्कालीन परिस्थिती केव्हीही उद्भवू शकते, ही बाब लक्षात घेत सर्व सरकारी यंत्रणांनी एकमेकांसोबत समन्वय राखण्याचे आदेश नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत. पावसाळ्यापूर्वीच्या कामांचा आढावा घेण्यासाठी शहर आपत्ती व्यवस्थापन समितीच्या झालेल्या बैठकीत नार्वेकर यांनी विविध सरकारी यंत्रणांच्या कामांचा आढावा घेतला आहे.
पावसाळापूर्व कालावधीत करावयाच्या कामांना २५ मे पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार प्रत्यक्ष वेळेत किती कामे झाल्याची सविस्तर माहिती संबंधित प्राधिकरणांकडून आयुक्तांनी घेतली आहे. पालिकेने नैसर्गिक नालेसफाई व बंदिस्त गटारे सफाई तसेच मलनिस्सारण वाहिन्या सफाईचे काम पूर्ण केले आहे. एमएमआरडीएमार्फत बांधण्यात येत असलेला ऐरोली ते काटई नाका मार्गावरील पुलाखाली सेक्टर ३, ऐरोली येथील मोठ्या नाल्याच्या सफाईचे कामही पूर्ण झाल्याची माहिती यावेळी एमएमआरडीएमार्फत देण्यात आली. रेल्वे परिसरातील गटारे सफाईचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे ही कामे दोन दिवसात पूर्ण करावे, असे निर्देश यावेळी आयुक्तांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना दिले.
----------------------------
सिडको, रेल्वे प्रशासनाला तंबी
- रेल्वे स्टेशन परिसरातील सफाई तसेच तेथे अनेक महिने उभ्या असलेल्या गाड्यांबाबत आयुक्त राजेश नार्वेकर यांनी आदेश देत अशी वाहने हलवण्याबाबत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल संध्याकाळपर्यंत महापालिका आपत्कालीन व्यवस्थापन विभागाला सादर करण्याचे निर्देश दिले.
- रेल्वेमार्फत उभारण्यात आलेले होर्डिंग अत्यंत मोठ्या आकाराचे असून स्थानिक प्राधिकरण म्हणून नवी मुंबई महापालिकेचा ना हरकत दाखला घेण्यात आला आहे, काय याची तपासणी करावी तसेच महापालिका क्षेत्रातील सर्वच होर्डिंगच्या आकाराबाबत तपासणी करण्यात यावी, असे निर्देश आयुक्तांनी दिले.
-----------------------------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT