मुंबई

डायलिसिस रुग्णांना एसटी प्रवासात शंभर टक्के सवलतीची मागणी

CD

श्रीवर्धन, ता. ११ (बातमीदार) : किडनी विकाराने त्रस्त असलेल्या रुग्णांना सध्या एसटीमध्ये शंभर किलोमीटर प्रवासाला शंभर टक्के सवलत आहे. मात्र हीच सवलत किलोमीटरची न अट न ठेवता पूर्णतः करण्याची मागणी रुग्ण करत आहेत. श्रीवर्धन तालुक्यातील दांडा येथील रितेश तोडणकर हे गेली अकरा वर्षांपासून किडनीविकाराने त्रस्त असून आठवड्यातून दोनदा डायलिसिस करत आहे. मात्र माणगाव येथील रुग्णालयात डायलिसिससाठी रुग्ण संख्या पूर्ण झाल्याने तिथे डायलिसिस होत नाही किंबहुना पेण येथे डायलिसिससाठी जावे लागते. श्रीवर्धन ते पेण हे ११५ किलोमीटरवर आहे आणि शासन फक्त शंभर किलोमीटरपर्यंतच डायलिसिस रुग्णांना प्रवासात शंभर टक्के सवलत देते. जाण्यायेण्यात दोनशे तीस किलोमीटर होतात. तोडणकर यांना महिन्याला आठ वेळा पेण येथे जावे लागते. माझ्यासारख्या अनेकांना हा प्रवास अतिशय मानसिक त्रास व खर्चिक असतो, असे तोडणकर यांनी सांगितले. त्यामुळे अशा डायलिसिस रुग्णांना शंभर टक्के सवलतीची देण्याची मागणी रुग्णांकडून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thalapathy Vijay Oath Ceremony : थलपती विजय यांचा शपथविधी १० वाजता, राहुल गांधीसह मान्यवरांची उपस्थिती; ज्योतिषांनी शपथविधीची वेळ बदलली

Mother's Day 2026: ‘मदर्स डे’ची सुरुवात करणारी महिलाच शेवटी त्याच्या विरोधात का उभी राहिली?

साप्ताहिक राशिभविष्य : (१० मे २०२६ ते १६ मे २०२६)

मेष साप्ताहिक राशिभविष्य (१० मे २०२६ ते १६ मे २०२६) : भागीदारीतील अडथळे दूर होणार, करिअरमध्ये नवे मार्ग सापडणार

Sunday Special Breakfast: रविवारी नाश्त्याला बनवा स्पेशल 'पोहा नारियल इडली', पाहा या रेसिपीचा सोपा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT