मुंबई

नालेसफाई कामासाठी मदतकेंद्राची गरज

CD

भाईंदर, ता. १४ (बातमीदार) : नालेसफाईसंदर्भातील नागरिकांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी महापालिकेने तक्रार निवारण कक्ष स्थापन करून मदतकेंद्राची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

एप्रिल महिन्यापासून नालेसफाईचे काम चालू आहे. आता पावसाळा आला आहे, मात्र नालेसफाई वरवर झाली असली तरी गाळ खोलवर जाऊन पूर्णपणे काढला जात नाही. त्यात प्लास्टिक पिशव्या, बाटल्या व इतर कचरा पाण्यावर तरंगताना आढळून येतो. थोडाफार काढलेला गाळ सुकवण्याच्या नावाखाली बाजूला काढून ठेवला जातो. काही दिवसांनंतर तो पुन्हा नाल्यात जातो. दरवर्षी आयुक्त नालेसफाईच्या कामाचा आढावा घेण्यासाठी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करीत असले तरी कंत्राटदार व त्याच्या कर्मचाऱ्यांवर प्रशासनाचे नियंत्रण नसते, असे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी तथा जिल्हा प्रवक्ते प्रकाश नागणे यांनी म्हटले आहे.

नालेसफाईसंदर्भात प्रशासनाने तक्रार निवारण कक्ष स्थापन करून शहरातील जागरूक नागरिक, स्थानिक रहिवासी, सामाजिक कार्यकर्ते यांना सहभागी करून घ्यावे. यासाठी एक हेल्पलाईन वा व्हॉट्सॲप क्रमांक प्रशासनाने जाहीर करावा, जेणेकरून स्थानिक नागरिकांकडून शहरातील विविध भागातील नालेसफाईच्या संदर्भातील प्राप्त तक्रार, छायाचित्रे पाहून संबंधित यंत्रणा त्याचा निपटारा करतील, अशी मागणी प्रकाश नागणे यांनी आयुक्त दिलीप ढोले यांना निवेदनाद्वारे केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Property Tax: पुणे महानगरपालिकेत भाजपने करमाफीचा शब्द फिरवला; ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना टॅक्स माफी नाही

Gas Cylinder Shortage : छत्रपती संभाजीनगर तालुक्यात ग्रामीण भागात गॅस टंचाई; लग्नसमारंभ व हॉटेल व्यवसाय अडचणीत, अनेक हाँटेल गॅसअभावी बंद

Latest Marathi News Live Update: PNG गॅस आणि पेट्रोलियम उत्पादनांच्या स्थितीबाबत उच्चस्तरीय आढावा बैठकीचे आयोजन

Theur Fraud News : लँड डेव्हलपरला मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून १२ कोटींचा घातला गंडा

Pachod News : केकत जळगाव येथे कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT