मुंबई

तळोजा वसाहतीत सिडकोचा दुजाभाव

CD

खारघर, ता. १२ (बातमीदार) : सिडकोने तळोजा वसाहतीत सर्व नागरी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत; मात्र पेठाली मेट्रो स्थानकाशेजारी असलेल्या सेक्टर १२ मध्ये रस्ते, गटार, पथदिवे अशी कोणतीही कामे केली नसल्यामुळे रहिवाशांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
सिडकोने खारघरनंतर तळोजा फेज आणि दोन वसाहत निर्माण केली आहे. या दोन्ही वसाहतीत जवळपास चाळीस सेक्टरचा समावेश होतो. सिडकोने तळोजा शहर करत विकसित सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या; मात्र सेक्टर १२ मध्ये सांडपाणी वाहून नेण्यासाठी मलनिस्सारण वाहिन्या, रस्ते, गटारे आणि पथदिवे अशी कामे केलेली नाहीत. त्यामुळे एकीकडे चांगल्या सुविधा आहेत; तर दुसरीकडे पेठाली मेट्रो स्थानकालगत असलेले वाहनतळ, रस्ते, पथदिवे अशा सुविधाच नसल्याने रहिवाशांना विविध अडचणी येत आहेत. महत्त्वाचे म्हणजे पेठाली परिसरातील सांडपाण्याचा निचरा होत नसल्यामुळे सोसायट्यांच्या मागील बाजूस सांडपाण्याचे तळ साचले आहेत. त्यामुळे रहिवाशांना खिशातून पैसे खर्च करून मलनिस्सारण वाहिनींची कामे करण्याची वेळ आली आहे.
-------------------------------------
रहिवाशांच्या पदरी निराशा
तळोजा पाणी फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी सेक्टरमधील विविध समस्या सिडकोच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत. अशातच हा परिसर खाडीकिनाऱ्यालगत असल्यामुळे पावसाळ्यात वाढणाऱ्या झाडा-झुडपांमुळे सोसायटीच्या आवारात सापांचा वावर आहे. तसेच रस्त्याची कामे झाली नसल्यामुळे पावसात चिखलातून मार्ग काढावा लागणार आहे. त्यामुळे लाखो रुपयांचे कर्ज घेऊन घर खरेदी करणाऱ्या रहिवाशांची सिडकोने निराशा केली आहे.
--------------------------------------------
पेठाली परिसरातील रस्ते, मलनिस्सारण वाहिन्यांची कामे झालेली नाही. त्यामुळे सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.
- उस्मान काझी, रहिवासी
----------------------------------------
पेठालीतील सेक्टर १२ मधील कामाकडे लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. रस्त्यांचे डांबरीकरण करता येणार नाही; मात्र इतर कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.
- मिलिंद म्हात्रे, कार्यकारी अभियंता, तळोजा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: ''माझा भाऊ...'' मनोज जरांगेंच्या मुंबई आंदोलनावर अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया

National Unity Day : गुजरातमध्ये पार पडणार राष्ट्रीय एकता दिन ; संजीवनीचे बॅण्ड पथक देणार पंतप्रधान मोदींना सलामी

Noida Owl Terror: कुत्रे-माकडांनंतर आता घुबडांची दहशत; थेट डोक्यावर झडप, शहरातील नागरिकांमध्ये पसरली आहे भीती

Ganesh Aarti: यंदा गणपतीच्या आरतीसाठी पुस्तक शोधण्याची गरज नाही; सगळ्या आरत्या मिळवा एकाच ठिकाणी, एका क्लिकवर!

Marathi News Live Updates: ...तर आम्ही रस्त्यावर उतरु- बबनराव तायवाडे

SCROLL FOR NEXT