मुंबई

पावसाळापूर्व कामे कासवगतीने

CD

जुईनगर, ता. १४ (बातमीदार)ः नवी मुंबई महापालिका उद्यान विभागाच्या वतीने पावसाळापूर्व कामांसाठी ३१ मेपर्यंतची डेडलाईन देण्यात आली होती; मात्र तरीदेखील शहरातील धोकादायक वृक्षांची छाटणीची कामे चालू असून अनेक ठिकाणी पदपथांवर तोडलेल्या झाडांचे ढीग असल्याने रहिवाशांमध्ये नाराजी आहे. नवी मुंबई महापालिकेने पावसाळापूर्व कामाची सुरुवात केली आहे. भूमिगत गटारांची साफसफाई तसेच रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या वृक्षांची छाटणी केली जात आहे. यात विविध हाऊसिंग सोसायटीच्या अंतर्गत असणाऱ्या झाडांचादेखील समावेश आहे. मात्र, वृक्षछाटणीची ही कामे अतिशय संथगतीने सुरू असल्याने त्याचा त्रास रहिवाशांना होत आहे. नेरूळ, जुईनगर तसेच सानपाडा येथील विविध सोसायट्यांसमोर तसेच मुख्य मार्गावरील पदपथांवर तोडण्यात आलेल्या झाडांच्या फांद्या पडून आहेत. त्यात पावसाळा सुरू झाल्याने या फांद्या कुजण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे पालिकेने तातडीने तोडलेल्या फांद्या उचलाव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.
----------------------------------------
मुख्य रस्त्यांवर चालण्याची वेळ
जुईनगर- नेरूळ मुख्य स्टेशन मार्गावरील रस्त्यावरून नेरूळ, सेक्टर ८ येथील छत्रपती शाहू महाराज उद्यानाच्या समोरील पदपथावर तीन दिवसांपासून झाडांच्या फांद्या ‘जैसे थे’ स्थितीत आहेत. या मार्गावरून शालेय विद्यार्थी, नोकरदार वर्गाची ये-जा असते. अशातच तोडणी केलेल्या झाडांच्या फांद्या पदपथांवर असल्याने मुख्य रस्त्यावरून चालण्याची वेळ येत असल्याने अपघाताची शक्यता वर्तवली जात आहे.
---------------------------------------
पदपथावरच झाडांच्या फांद्या अनेक दिवसांपासून पडलेल्या आहेत. त्यामुळे लहान मुलांसह जीव मुठीत धरून वर्दळीच्या रस्त्यावरून चालावे लागते. हा प्रकार अपघाताला कारणीभूत ठरणार आहे.
- कोमल तांबे, प्रवासी
----------------------------------------------
शहरातील झाडाच्या फांद्यांची छाटणी उद्यान विभागाकडून केली जात आहे. सदर कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्यासाठी यंत्रसामग्री मागवण्यात आली आहे.
- राजेंद्र इंगळे, स्वच्छता अधिकारी, घनकचरा विभाग, महापालिका
----------------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, तर उद्धव ठाकरेंवर टीका, मराठी विजय मेळाव्यावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Video: दिवसाढवळ्या 'हॉटेल भाग्यश्री'ची फसवणूक! 'ही' आयडिया करुन लोक पैसे उकळायला लागले अन् फुटक खाऊ लागले

Viral Video: लग्नासाठी मुलगा आहे का? मुलीची अनोखी मागणी, दारुडा हवा नवरा, ५ लाख देणार हुंडा! ही 'डील' मिस करू नका!

Palghar News: महिनाभर 'या' पालघर मार्गावर अवजड वाहनांना बंदी, उल्लंघन करणाऱ्यांना प्रशासनाचा अलर्ट; काय आहेत पर्यायी मार्ग?

Latest Maharashtra News Updates : "एक मराठी प्रेमी,दुसरा खुर्चीप्रेमी" शिंदेंच्या शिवसेनेचं विजयी मेळाव्यानंतर ट्विट व्हायरल

SCROLL FOR NEXT