मुंबई

केंद्र सरकारविरोधात इंडियन युनियन मुस्लिम लीग आक्रमक

CD

केंद्र सरकारविरोधात इंडियन युनियन मुस्लिम लीग आक्रमक
देशभरात आंदोलन करण्याचा इशारा
मुंबादेवी, ता. १४ (बातमीदार) ः केंद्रात भाजपची सत्ता आल्यापासून घटनात्मक संस्थांवर नियोजनबद्ध पद्धतीने हल्ला होत असल्याचे विधान राहुल गांधी यांनी केले होते. त्‍या विधानाचा आधार घेत देशात भाजप सरकार सत्तेवर आल्यापासून मुस्लिमधार्मीयांच्या विरोधात वातावरण तापवले जात असल्‍याचा आरोप इंडियन युनियन मुस्लिम लीगने केला आहे. यासंदर्भात देशभरात आंदोलन करण्याचा इशाराही त्‍यांनी या वेळी दिला. मंगळवारी (ता. १३) इंडियन युनियन मुस्लिम लीगच्या अब्दुल रहमान यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांच्यासोबत नुर बानू आणि फरहद शेख या महिला उपस्थित होत्या.
अब्दुल रहमान म्हणाले की, महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारला पाडून भाजप सत्तेवर आल्यानंतर, परिस्थिती बदलली आहे आणि राज्यांमध्ये अल्पसंख्यकांच्या विरोधात अनेक घटना घडल्या आहेत. विशेषत: मुस्लिम समुदाय आणि सरकारने या प्रश्नांवर मौन बाळगले आहे आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांची यातून निष्क्रियता दिसून येत आहे. गेल्या दोन आठवड्यांत औरंगजेब आणि टिपू सुलतान यांच्या नावावरून द्वेषाला वेग आला आहे. शहरांची नावे बदलली जात आहेत जणू ते इतिहास बदलू शकतात. महाराष्ट्रात औरंग्याचे नाव कोणीही घेऊ शकणार नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधान भेदभाव करणारे आणि मुस्लिम समाजाच्या मूलभूत हक्कांच्या विरोधात असल्‍याचे रहमान यांनी या वेळी सांगितले.

मुंब्रा बंदला विरोध
जितेंद्र आव्हाड यांनी पुकारलेल्या मुंब्रा बंदला आमचा विरोध आहे, असे विद्यार्थी विंगच्या उपाध्यक्षा फरहद शेख यांनी म्हटले. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड स्वतःचे राजकारण चमकवण्यासाठी मुंब्रा बंद करीत आहेत. त्यामुळे तेथील दुकानदार आणि व्यापारीवर्गाचे मोठे नुकसान होईल. मुंब्रा येथे मुस्लिम तरुण अमली पदार्थ नशेच्या आहारी जात आहे. हे रोखले पाहिजे. मुलांना नशामुक्त करण्याची जबाबदारी सरकार, पोलिस, समाज आणि पालकांची आहे, असे त्यांनी पुढे म्हटले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case Update : अशोक खरात प्रकरणी उपजिल्हाधिकाऱ्यावर मोठी कारवाई, प्रशासनात खळबळ !

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 25 मार्च 2026

Panchang 25 March 2026: आजच्या दिवशी नारायण कवच या स्तोत्राचे पठण आणि ‘बुं बुधाय नमः’ या मंत्राचा जप करावा

राज्यरंग - पंजाब : राजकीय अस्थिरतेचा दुसरा अंक

मानसवेध : माझ्यात काहीतरी कमी आहे?

SCROLL FOR NEXT