मुंबई

अजूनही मुरबाडमध्ये पाणी टंचाई

CD

मुरबाड, ता. १४ (बातमीदार) : राज्यात मान्सूनचे आगमन झाले असले तरी अजूनही मुरबाड तालुक्यात पाणीटंचाईच्या झळा कायम आहेत. यंदा पाणीसाठ्यात कमालीची घट झाल्याने पाणीटंचाईच्या झळा अधिक तीव्र झाल्या आहेत. त्यामुळे अजूनही मुरबाड तालुक्यातील २० गावे आणि २८ पाड्यांना पाणीटंचाई जाणवत आहे. येथे सहा मोठे टँकर आणि जेथे मोठे टँकर जाऊ शकत नाहीत अशा ठिकाणी दोन लहान टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
तालुक्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी शासन कोट्यवधी रुपयांच्या योजना राबवत आहे. तरी दरवर्षी भेडसावणारी पाणीटंचाईची समस्या अजूनही कायम आहे. अनेक ठिकाणी नळ पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आल्या, पण अजूनही अनेक ठिकाणी नळाला पाणी आलेले नाही. दरम्यान, सध्या जून महिन्याचा दुसरा आठवडा संपत आला आहे. बिपरजॉय या चक्रीवादळामुळे झालेल्या हवामान बदलामुळे मान्सूनचा प्रवास मंदावला होता, तर दुसरीकडे यंदा गेल्या दोन महिन्यांत मोठ्या प्रमाणात उष्णता वाढल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी कमी झाली. त्यामुळे तालुक्यात पाणीटंचाईची परिस्थिती अजूनही कायम आहे. त्यामुळे सध्या तालुक्यातील २० गावे आणि २८ पाड्यांमध्ये टॅंकरने पाणीपुरवठा केला जात असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
....
‘कायमस्वरूपी उपाय हवेत’
तालुक्यात सर्व पाणवठ्यांनी तळ गाठला आहे. त्यामुळे आपली तहान भागवण्यासाठी नागरिकांना पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे या भेडसावणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शासन या भागात कायमस्वरूपी उपाययोजना राबविण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
.....
नागरिकांना किमान पिण्याचे पाणी मिळावे यासाठी प्रशासनाने आणखी टॅंकर उपलब्ध करावेत. तसेच ज्या ठिकाणी गल्लीबोळात टॅंकर जात नाहीत त्याठिकाणी ट्रॅक्टरने पाणीपुरवठा करावा, जेणेकरून नागरिक पाण्यापासून वंचित राहणार नाहीत.
- सुभाष घरत, माजी जिल्हा परिषद सदस्य, ठाणे
....
पाणीटंचाईमुळे टॅंकरची मागणी वाढत आहे. यासाठी तीन कनिष्ठ अभियंता नेमण्यात आले आहेत. ग्रामपंचायतीकडून पाण्याबाबत जशी मागणी येईल, तसे प्रस्ताव तहसीलदार कार्यालयाकडे सादर करून मान्यता घेत आहोत. तसेच ज्या ठिकाणी टॅंकर जात नाहीत त्या ठिकाणी दोन ट्रॅक्टर टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
- जगदीश बनकरी, उप अभियंता, पाणीपुरवठा विभाग, मुरबाड

फोटो ओळी
मुरबाड ः तालुक्यातील ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT