मुंबई

२०७ ग्रामपंचायतीत वाजणार बिगूल

CD

अलिबाग, ता. १४ (बातमीदार) ः जानेवारी ते डिसेंबर २०२३ या कालावधीत मुदत संपणाऱ्या, नवनिर्मित व २०२२ मध्ये चुकीची प्रभाग रचना, आरक्षण झाल्यामुळे निवडणुका होऊ शकल्या नाहीत, अशा ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी नव्याने आरक्षण सोडतीचा कार्यक्रम निवडणूक विभागाने जाहीर केला आहे. जिल्ह्यातील २०७ ग्रामपंचायतीचा यात समावेश असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
ग्रामपंचायत आरक्षण सोडतीचा कार्यक्रम १६ जून ते १७ जुलै या कालावधीत होणार आहे. त्यामध्ये १६ जून रोजी आरक्षण सोडत काढण्यासाठी विशेष ग्रामसभेची सूचना देणे. २१ जून रोजी विशेष ग्रामसभा बोलावून, तहसीलदार यांनी नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, व सर्वसाधारण महिला आरक्षण सोडत काढणे, २२ जून रोजी आरक्षण सोडतीनंतर प्रभागनिहाय आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध करणे, प्रभागनिहाय आरक्षण निश्‍चितीबाबत हरकती व सूचना २३ ते ३० जून या कालावधीत दाखल करणे, ६ जुलै रोजी उपविभागीय अधिकारी यांनी प्राप्त हरकती विचारात घेऊन अभिप्राय देणे, १२ जुलै रोजी उपविभागीय अधिकारी यांचा अभिप्राय विचारात घेऊन अंतिम अधिसूचनेस जिल्हाधिकारी यांनी मान्यता देणे तसेच १४ जुलै रोजी अंतिम प्रभाग रचनेला व्यापक प्रसिद्धी देणे ही प्रक्रिया पार पडणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder 5 KG पाच किलो एलपीजी सिलिंडरबाबत नवा नियम, खरेदीसाठी ओळखपत्र बंधनकारक

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

SCROLL FOR NEXT