मुंबई

शहापूर पंचायत समितीला कोकण विभागस्तरीय पुरस्कार

CD

शहापूर पंचायत समितीला कोकण विभागस्तरीय पुरस्कार

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १४ : यशवंत पंचायत राज अभियान २०२२-२०२३ मध्ये राज्यातील अति उत्कृष्ट जिल्हा परिषद व पंचायत समिती यांना विभाग व राज्यस्तरावर पुरस्कार प्रदान करण्यात येत असतो. त्यानुसार यंदा कोकण विभागस्तरीय पुरस्कारामध्ये शहापूर पंचायत समिती तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले आहे. त्यांना उत्कृष्ट पंचायत समिती म्हणून पुरस्कार जाहीर झालेला आहे.
२०२१-२०२२ या अहवाल वर्षामध्ये केलेल्या कामाचे मुल्यमापन विचारात घेऊन विभागस्तर व राज्यस्तर अशा दोन स्तरावर “यशवंत पंचायत राज अभियान” ही अभिनव पुरस्कार योजना राबवण्यात आली होती. या अभियानांतर्गत राज्यातील तीन पंचायत समित्यांची पुरस्कारासाठी राज्य स्तरावर आणि विभाग स्तरावर निवड करण्यात येते. यामध्ये पंचायत राज प्रशासन व विकास कार्यात उत्कृष्ठ काम करणाऱ्या पंचायत समित्यांची निवड केली जाते. पंचायत समितीच्या किमान सभेचे आयोजन करणे, पंचायत समिती रचना व कार्यपद्धती, कर्मचारी व्यवस्थापन, अंगणवाडीतील मूलभूत सुविधा, परिसर सुधारणा, आरोग्य विभागाकडील प्रसूतिपूर्व नोंदणी व तपासणी, संस्थात्मक प्रसूति, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना, ग्रामीण गृहनिर्माण (प्रधानमंत्री आवास योजना, शबरी आवास येाजना, रमाई आवास योजना इत्यादी) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नत्ती अभियान, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत हगणदारीमुक्त गाव, सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन, बेसलाईन सर्व्हे बाहेरील कुटुंबाचे शौचालय बांधकाम, म.ग्रा.रो.ह. योजना अंतर्गत मनुष्य दिवस निर्मिती यांसारख्या कामामध्ये उल्लेखनीय केलेल्या कामाचा दाखला घेत पंचायत समिती शहापूरला कोकण विभागीय स्तरावराचा तृतीय क्रमांकाचा पुरस्कार महाराष्ट्र सरकारकडून जाहीर झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganesh Visarjan 2026 : कसबा ते दगडूशेठ... पुण्यात आज गणरायाला निरोप; विसर्जन मिरवणुकीसाठी जय्यत तयारी

आजचे पंचांग 25 सप्टेंबर 2026! अनंत चतुर्दशी, गणपती विसर्जन; जाणून घ्या राहुकाळ आणि शुभ मुहूर्त

आजचे राशिभविष्य - 25 सप्टेंबर 2026

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 25 सप्टेंबर 2026

Hotel Gas Leakage : हॉटेलच्या किचनमध्ये गॅस गळती; सिलेंडरने घेतला पेट, कोंढवा बुद्रुकमधील घटनेत दोन कामगार जखमी

SCROLL FOR NEXT