मुंबई

सोने चोरणाऱ्या टोळीचा भंडाफोड

CD

नालासोपारा, ता. १४ (बातमीदार) : सोने चोरणाऱ्या टोळीचा विरारमध्ये भंडाफोड करण्यात आला आहे. या टोळीत पाच जण असून यातील एक महिला आणि दोन पुरुषांना अटक करण्यात यश आले आहे. त्यांच्याकडून ६ लाख ८८ हजार ९६० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींनी विरार, वालीव, अर्नाळा, पालघर, डहाणू या हद्दीतील सहा गुन्ह्यांची कबुली दिली आहे. बाळकृष्ण गायकवाड, ज्योती जसवंत सोळंकी अशी चोरांची नावे आहेत.

या पाच जणांच्या टोळीने १ जून रोजी विरार पूर्व येथील वैभव ज्वेलर्समध्ये सोने खरेदी करण्याच्या बहाण्याने शिरून हातचलाखीने चोरी केली होती. याप्रकरणी विरार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच प्रकारचे गुन्हे इतर ठिकाणीही घडल्यामुळे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू करण्यात आला. ज्या परिसरात असे गुन्हे घडले आहेत त्या सर्व ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासून बाळकृष्ण गायकवाड याला अटक करण्यात आली. त्याची चौकशी केली असता सर्व गुन्ह्यांची उकल झाली. हे आरोपी सराईत असून यांनी मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबई, गुजरात या परिसरातील अनेक पोलिस ठाणे हद्दीत अशाच प्रकारचे गुन्हे केले असून तेही उघड होतील, असे पोलिस उपनिरीक्षक संदेश राणे यांनी सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic: पुणेकर झाले पोलिस! ४० लाख नागरिकांनी कमावून दिले १२ कोटी; ‘पीटीपी’ला राष्ट्रीय पुरस्कार

Pune Fraud News : बांधकाम व्यावसायिक महिलेची पावणेसहा कोटींची फसवणूक; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : माढा तालुका पंचायत समितीवर भाजप आणि अजित पवार गटाची सत्ता

Kirit Somaiya : बांगलादेशींना शोधण्यासाठी तीन वर्षातील जन्मदाखले तपासा; किरीट सोमय्या यांनी घेतली महापालिकेत बैठक

Naresh Mhaske : सुज्ञ जनतेने काँग्रेस आणि आघाडीला धुळ चारली; नरेश म्हस्के यांचे विरोधकांवर टीकास्त्र

SCROLL FOR NEXT