मुंबई

वाईन शॉप फोडणाऱ्या सराईत चोरट्यांना अटक

CD

सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली, ता. १६ : डिलक्स वाईन शॉपचे शटर व आतील लोखंडी ग्रील उचकटून चोरट्यांनी गल्ल्यातील आठ लाखांची रोकड लंपास केल्याची घटना डोंबिवलीत घडली होती. याप्रकरणी रामनगर पोलिसांनी सीसी टीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेत तिघांना अटक केली आहे. सरुउददीन शेख (वय ३२), जुबेर जलील अन्सारी (वय २६) आणि शहाबुददीन ताजउददीन शेख (वय ३२) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी आरोपींकडून तीन लाख ५० हजारांची रक्कम हस्तगत केली आहे. कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपींना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. कल्याण पश्चिमेला राहणारे रवींद्र शेट्टी यांचे डोंबिवलीमध्ये डिलक्स वाईन शॉप मार्ट आहे. रविवारी रात्री दुकान बंद केले असता चोरट्यांनी रात्री १०.३० ते पहाटे ३ च्या दरम्यान दुकानाचे शटर उचकटून व आतील लोखंडी ग्रील कापून दुकानात प्रवेश केला. त्यानंतर दुकानातील आठ लाख रुपयांची रोकड चोरट्यानी लंपास केली होती. शेट्टी यांच्या तक्रारीनुसार रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक बळवंत भराडे, सहायक पोलिस निरीक्षक बळवंत भराडे, योगेश सानप, पोलिस हवालदार विशाल वाघ, भणगे, शिवाजी राठोड, नितीन सांगळे यांच्या पथकाने तपास केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Rate Hike: पेट्रोल ₹5 तर डिझेल 3 रुपयांनी महाग! नवे दर लागू; महाराष्ट्रात 1 लिटर आता कितीला?

IND vs WI, 3rd ODI: अंशुल कंबोजचं भारतासाठी पदार्पण, सिराजलाही संधी; पण दोघांना वगळलं; पाहा Playing XI

‘सोबत राहा, महिन्याला स्टायपेंड देतो’; विवाहित निर्मात्याची रेणुका शहाणेंना विचित्र ऑफर, प्रस्ताव ऐकून अभिनेत्रीला बसला धक्का

ओये बिर्याणी एक और कॅच छोड़ ना!’ भारतीय फॅन्सनी सैम अयूबची घेतली फिरकी; आधी वैभवला OUT करून पाळणा हलवला, नंतर दोन कॅच सोडले VIDEO व्हायरल

Latest Marathi News Live Update : ठाकरे बंधूंच्या 'गर्जना' मोर्चाला शेकापचा पाठिंबा

SCROLL FOR NEXT